महाराष्ट्रावर शोककळा : अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनावर देशभरातून श्रद्धांजलीचा वर्षाव

अजित पवार

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले असून या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. राज्याच्या राजकारणात चार दशकांहून अधिक काळ प्रभावी भूमिका बजावणारे, प्रशासनावर मजबूत पकड असलेले आणि निर्णयक्षम नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

या दुर्घटनेनंतर देशातील सर्वोच्च नेतृत्वापासून ते राज्यातील सहकारी, विरोधक, सामाजिक-राजकीय क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनीच तीव्र दुःख व्यक्त केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर देशातील अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त करत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शोकसंदेश

Related News

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हिंदीतून शोकसंदेश देताना म्हटले,

*“महाराष्ट्र के बारामती में एक विमान दुर्घटना में महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री, श्री अजित पवार समेत कई लोगों की मृत्यु का समाचार अत्यंत दुखद है…

अजित पवार जी का असामयिक निधन एक अपूरणीय क्षति है…

उन्हें महाराष्ट्र के विकास में, विशेषकर सहकारी क्षेत्र में, विशेष योगदान के लिए सदैव याद रखा जाएगा…”*

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्रद्धांजली

Baramati crash landing | PM Narendra Modi condoles the ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त करत म्हटले आहे की,

“Shri Ajit Pawar Ji was a leader of the people, having a strong grassroots level connect. He was widely respected as a hardworking personality at the forefront of serving the people of Maharashtra. His understanding of administrative matters and passion for empowering the poor and downtrodden were also noteworthy. His untimely demise is very shocking and saddening. Condolences to his family and countless admirers. Om Shanti.”

पंतप्रधानांनी अजित पवार यांच्या लोकांशी असलेल्या थेट संपर्काचा, प्रशासनातील अनुभवाचा आणि दुर्बल घटकांसाठी असलेल्या संवेदनशील दृष्टिकोनाचा विशेष उल्लेख केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रतिक्रिया

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मराठीतून भावना व्यक्त करत म्हटले आहे की,

*“आज एका अत्यंत दुःखद अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे एनडीएचे (NDA) ज्येष्ठ सहकारी अजित पवार जी यांना गमावल्याची बातमी ऐकून मन अत्यंत व्यथित झाले आहे…

अजित पवार जी यांनी गेली साडेतीन दशके ज्या प्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक वर्गाच्या कल्याणासाठी स्वतःला समर्पित केले, ते शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे…

त्यांचे निधन ही NDA कुटुंबासह माझी देखील वैयक्तिक हानी आहे…

दुःखाच्या या प्रसंगी संपूर्ण एनडीए शोकाकुल पवार परिवारासोबत खंबीरपणे उभा आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या चरणी स्थान देवो.

ॐ शांती शांती शांती.”*

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भावूक प्रतिक्रिया

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अजित पवार यांच्याशी असलेल्या वैयक्तिक नात्याचा उल्लेख करत म्हटले,

*“महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार जी यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक, दुर्दैवी आणि दुःखद आहे…

गेली अनेक वर्षं राज्याच्या विधिमंडळात सोबत काम करताना अजितदादांशी अतिशय जवळचा संबंध राहिला आहे…”*

राजनाथ सिंग  यांचे शोक व्यक्त करणारे शब्द

*“महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अकाली निधनाचे वृत्त ऐकून मला तीव्र धक्का बसला आहे…

जनतेप्रति असलेले प्रेम, तळमळ आणि लोकसेवेची निष्टा यासाठी ते ओळखले जात…”*

रामदास आठवले : “पुरोगामी गडाचा खंबीर बुरुज कोसळला”

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अत्यंत भावनिक शब्दांत प्रतिक्रिया दिली,

महाराष्ट्र के प्रगतिशील गढ़ का एक मज़बूत बुर्ज़ आज ढह गया है।

आज मन बहुत व्यथित है। अजित पवार राजनीति के एक ऐसे ‘पावरफुल’ नेता थे, जिनके शब्दों में वज़न और फैसलों में धार होती थी। दादा की प्रशासनिक पकड़ और समय की पाबंदी सभी के लिए एक आदर्श थी। वे साफ़गोई के लिए जाने जाते थे जो मन में होता, वही बेझिझक सामने कह देते थे। ऐसे स्पष्ट और रोखठोक नेता का जाना, महाराष्ट्र की राजनीति के एक तेज़ और प्रभावशाली युग का अंत है।

महाराष्ट्र हमेशा से प्रगतिशील विचारधारा का गढ़ रहा है, और आज इस गढ़ का एक मज़बूत बुर्ज़ ढह गया। दादा ने हमेशा दलितों, मेहनतकशों और वंचितों के सवालों पर अपनी ठोस और स्पष्ट भूमिका रखी। रिपब्लिकन आंदोलन के प्रति उनके मन में सदैव आत्मीयता रही। सत्ता में हों या विपक्ष में, उनका कहा हुआ शब्द अंतिम माना जाता था। उनके कार्य और योगदान की विरासत को महाराष्ट्र कभी भुला नहीं पाएगा। मैं अपने पक्ष की ओर से और व्यक्तिगत रूप से उन्हें भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता हूँ।

 

प्रकाश आंबेडकर यांची मागणी – अपघाताची सखोल चौकशी व्हावी

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी इंग्रजीतून प्रतिक्रिया देत म्हटले,

*“Deeply shocked by the sudden demise of Maharashtra Deputy Chief Minister and NCP President Ajit Pawar…The plane crash incident… needs a proper investigation.”*

धनंजय मुंडे यांचा हृदयद्रावक शोक

राज्यमंत्री धनंजय मुंडे यांनी लिहिलेले शब्द अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारे ठरले,

*“आज पुन्हा पोरका झालो…माझे दादा मला पोरका करून गेले…”*

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सविस्तर श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या प्रशासकीय कार्याचा सविस्तर आढावा घेत भावनिक श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या राजकीय, आर्थिक व विकासात्मक योगदानाचा उल्लेख केला.

राज्यभर शोक, कार्यकर्त्यांमध्ये हळहळ

अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह महाराष्ट्रातील राजकीय वातावरण शोकमग्न झाले आहे. अनेक ठिकाणी श्रद्धांजली सभा, मौन पाळणे, कँडल मार्चचे आयोजन करण्यात येत आहे. एक अनुभवी प्रशासक, कडक निर्णय घेणारा नेता आणि विकासाला प्राधान्य देणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख कायम स्मरणात राहील, अशी भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

read also  :  https://ajinkyabharat.com/learjet-45-plane-crash-history-200-accidents-worldwide-powerful-aviation-truth-report-2026/

Related News