भारतीय चौकीवर कब्जा करण्याचा कट उधळला

जम्मू-काश्मीर

लष्कराकडून एका पाकी घुसखोराचा खात्मा

जम्मू-काश्मीरनजीक नियंत्रण रेषेवर कुपवाडा जिल्ह्यातील त्रेहगाम क्षेत्रातील

कुमकडी येथे भारताच्या चौकीवर कब्जा मिळविण्याचा पाकिस्तानचा कट

Related News

भारतीय लष्कराने शनिवारी हाणून पाडला.

या चकमकीत एका पाकिस्तानी घुसखोराचा खात्मा करण्यात आला.

यावेळी भारताचा एक जवानही शहीद झाला असून,

कॅप्टन या पदावरील अधिकाऱ्यासहित चारजण जखमी झाले.

ही चकमक काही तास सुरू होती.

यासंदर्भात लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की,

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या बॉर्डर

अॅक्शन टीम (बीएटी) च्या सैनिकांनी भारतीय चौकीवर हल्ला करून

ती ताव्यात घेण्याचा प्रयत्न केला. हा कट भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देऊन हाणून पाडला.

त्यात पाकिस्तानी घुसखोर ठार झाला असून, भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला.

नियंत्रण रेषेवर कामकारी बीएटीच्या कमांडोंनी क्षेत्रामध्ये

भारतीय लष्कराच्या एका चौकीवर हल्ला करण्यात आला.

चकमकीत एका पाकिस्तानी घुसखोराचा खात्मा करण्यात आला.

चार जखर्मीना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/the-question-of-maratha-reservation-in-the-legislative-assembly-is-margi-lavnar/

Related News