लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरतीच -शरद पवार

जनतेचा

जनतेचा दाखला देत शरद पवारांचं भाष्य,

मोदीही फसवणूक करत असल्याचा दावा

राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरून गदारोळ सुरू आहे.

Related News

योजनेवर विरोधकांनी टीका केली त्याचबरोबर

अर्थखात्याने देखील यावर आक्षेप घेतला आहे.

या योजनांबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट)

अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

राज्याच्या तिजोरीमध्ये काही नाही.

प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होण्याआधी या योजनेच्या माध्यमातून

एखादा दुसरा हफ्ता देऊन जनमाणूस आपल्या बाजूला करण्याचा

प्रयत्न यातून दिसून येतो आहे. लोकांमध्ये अशीही चर्चा आहे

या योजना तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत.

पुर्वी यांच्या हातात सत्ता असताना असे निर्णय का घेतले नाहीत अ

शी चर्चा नागरिकांमध्ये आहे त्याचा काही ना काही परिणाम होईल

असंही शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.

सरकारच्या या योजना तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत.

एखादं दुसरा हफ्ता देऊन लोकांना

आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असंही शरद पवार पुढे म्हणाले.

Read also: https://ajinkyabharat.com/4-days-solapur-pune-railway-train-canceled/

Related News