इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कामासाठी ब्लॉक
सोलापूर विभागातील दौंड येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगची कामे करण्यात येणार आहेत.
त्यामुळे त्याचा परिणाम सोलापूर-पुणे रेल्वे सेवेवर होणार आहे.
Related News
सोलापूर पुण्यादरम्यान, धावणाऱ्या 17 रेल्वे रद्द झाल्या आहेत.
दौंड येथे फेज वनमधील प्री एनआय, गुड यार्ड, ए केबिन, कॉर्ड लाइन
आदी ठिकाणी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
या कामासाठी 27 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
त्यामुळे विभागातून धावणाऱ्या 17 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
21 गाड्या मिरजमार्गे वळविण्यात आल्याची माहिती सोलापूर
रेल्वे विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.
यामुळे सलग 4 दिवस रेल्वे सेवेत विस्कळितपणा येणार आहे.
याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही रेल्वे प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
रद्द झालेल्या रेल्वे गाड्या:
नांदेड-पनवेल एक्स्प्रेस
पनवेल – नांदेड एक्स्प्रेस
पुणे – सिकंदराबाद एक्स्प्रेस
सिकंदराबाद – पुणे एक्स्प्रेस
पुणे – सोलापूर एक्स्प्रेस
सोलापूर – पुणे एक्स्प्रेस (12270)
पुणे – सोलापूर (11417)
सोलापूर – पुणे (11418)
मिरजमार्गे वळविलेल्या 21 गाड्या
लोकमान्य टिळक टर्मिनस – विशाखापट्टणम एक्स्प्रेस ही रेल्वे पुणे – मिरज – कुर्डुवाडीमार्गे धावेल
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बंगळूर एक्स्प्रेस ही रेल्वे पुणे – मिरज – कुर्डुवाडीमार्गे धावे
बेंगळुरु – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस ही रेल्वे कुर्डुवाडी – मिरज – पुणेमार्गे धावेल
नागरकोईल – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस ही रेल्वे गुंतकल -बल्लारी -हुबळी -मिरज -पुणेमार्गे धावेल
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागरकोईल ही रेल्वे पुणे- मिरज- हुबळी- बल्लारी- गुंतकलमार्गे धावेल
चेन्नई – एकता नगर एक्स्प्रेस गुंतकल- बल्लारी- हुबळी- मिरज- पुणेमार्गे धावेल
कन्याकुमारी – पुणे एक्स्प्रेस कुर्डुवाडी- मिरज- पुणेमार्गे धावेल
हजरत निजामुद्दीन – हुबळी मनमाड- इगतपुरी- कल्याण- पनवेल- कर्जत- पुणे- मिरज- हुबळी मार्गे धावेल
वाराणसी – हुबळी एक्स्प्रेस मनमाड- इगतपुरी- कल्याण- पनवेल- कर्जत- पुणे- मिरज- हुबळी मार्गे धावेल
गदग – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस गदग- हुबळी- मिरज- पुणेमार्गे धावेल
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गदग एक्स्प्रेस पुणे- मिरज- हुबळी- गदगमार्गे धावेल
पंढरपूर-दादर एक्स्प्रेस मिरज-सातारा- पुणेमार्गे धावेल
दादर-पंढरपूर एक्स्प्रेस पुणे-सातारा-मिरजमार्गे धावेल
लोकमान्य टिळक टर्मिनस – कोइमतूर एक्स्प्रेस गुंतकल- बल्लारी- हुबळी- मिरज- पुणेमार्गे धावेल
कोइमतूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस पुणे- मिरज- हुबळी- बल्लारी- गुंतकल धावेल
तुतिकोरीन – ओखा एक्स्प्रेस गुंतकल- बल्लारी- हुबळी- मिरज- पुणेमार्गे धावेल
यशवंतपूर – बाडमेर एक्स्प्रेस गुंतकल- बल्लारी- हुबळी- मिरज- पुणेमार्गे धावेल
नागरकोईल -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस पुणे-मिरज-हुबळी-बल्लारी-गुंतकलमार्गे धावेल
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागरकोईल एक्स्प्रेस गुंतकल- बल्लारी- हुबळी- मिरज- पुणेमार्गे धावेल
चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस गुंतकल- बल्लारी- हुबळी- मिरज- पुणे धावेल
अहमदाबाद – यशवंतपूर एक्स्प्रेस सुरत – वसई रोड- पुणे- मिरज- हुबळीमार्गे धावेल
Read also: https://ajinkyabharat.com/kamala-harris-files-nomination-for-us-presidents-election/