महाराष्ट्रातील जागावाटपासाठी 10 जणांची समिती; मुंबईतील 3 नेत्यांना स्थान

काँग्रेसचे

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आदेशान्वये

महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी काँग्रेसने समिती गठीत केली आहे.

लोकसभा निवडणुकीत घवघवतीत यश मिळाल्यानंतर काँग्रेसने आता

Related News

विधानसभा निवडणुकांची तयारी केली आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांच्या नेतृत्वात लोकसभेला

काँग्रेस पक्षाला तब्बल 13 जागांवर विजय मिळाला.

गत 2019 च्या तुलनेत काँग्रेस 1 जागेवरुन 13 जागेवर पोहोचल्याने

पक्षश्रेष्ठींची मर्जी राखण्यातही नाना पटोले यांना यश मिळालं आहे.

त्यामुळे विधानसभा निवडणुकांही काँग्रेसने नाना पटोले यांच्याच नेतृत्वात

निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र, या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढल्या जाणार आहेत.

त्यामुळे, महाराष्ट्रातील 288 विधानसभेच्या जागांवर काँग्रेस,

शिवसेना ठाकरे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात वाटाघाटी होणार आहे.

कॉँग्रेसने महाविकास आघडीतील  या समन्वयासाठी 10 जणांची समिती नेमली आहे.

तर, मुंबईसाठी या समितीत 3 नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आदेशान्वये महाविकास आघाडीत

जागा वाटपासाठी काँग्रेसने 10 सदस्यांची समिती गठीत केली आहे.

त्यामध्ये, महाराष्ट्रातील जागावाटपासाठी 7 जणांची तर मुंबईसाठी तिघांना स्थान देण्यात आलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट

आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महाविकास आघाडी आहे.

त्यामुळे, महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांच्या जागावाटपाचे सुत्र ठरवण्यासाठी

राजकीय पक्षांचे प्रमुख नेते पुढाकार घेणार आहेत. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने या चर्चांसाठी

दिल्लीतून वरिष्ठ नेते प्रत्यक्ष दरवेळी येऊ शकत नाही.

त्यामुळेच, काँग्रेसने महाराष्ट्रात 10 नेत्यांची समिती नियुक्त केली आहे.

त्यामध्ये, जुन्या व वरिष्ठ नेत्यांना संधी देण्यात आली आहे.

तर, मुंबईसाठी मुंबईतील तीन प्रमुख नेत्यांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/india-navvyanda-woman-ashiya-kapchayas-last-journey/

Related News