महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आज जलमय झाली आहे.
पुण्यातील कित्येक वर्षांचा रेकॉर्ड आजच्य पावसाने तोडला आहे.
शहरातील अनेक भागात पाणीच पाणी झालं असून पाण्यातून मार्ग
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
नागरिकांना काढावा लागत आहे.
दुसरीकडे मुंबईतही मुसळधार पाऊस सुरू असून कल्याण, ठाणे
आणि परिसरात पावसाच्या पाण्यामुळे तेथील नद्यांना पूर आला आहे.
बदलापूरजवळील उल्हास नदीला पूर आला असून रस्तेही जलमय झाले आहेत.
त्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.
सध्या कर्जत ते कल्याण वाहतूक बंद असून पुणे-मुंबई मध्य रेल्वे मार्गावरील
काही महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे, पुण्याला जाणाऱ्या आणि पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.
पुण्यात पावसामुळे आज जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे.
पालकमंत्री अजित पवार यांनीही पुण्यातील काही भागांत दौरा करुन पाहणी केली.
तर, प्रशासनही अलर्ट मोडवर आहे.
त्यातच, मध्य रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मुंबई पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस, मुंबई पुणे प्रगती एक्सप्रेस
आणि पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस आज 25 जुलै रोजी रद्द करण्यात आल्या आहेत.
तर, उद्या सकाळी पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस, पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस
आणि मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे.
त्यामुळे, पुणे-मुंबई व मुंबई-पुणे येथील प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे.
मुंबईहुन-पुण्याकडे जाणाऱ्या या एक्सप्रेस रद्द
डेक्कन क्वीन एक्सप्रेस
प्रगती एक्सप्रेस
आज पुण्याहून-मुंबईकडे जाणाऱ्या या एक्सप्रेस रद्द
इंटरसिटी एक्सप्रेस
उद्या पुण्याहून-मुंबईकडे जाणाऱ्या या एक्सप्रेस रद्द
डेक्कन एक्स्प्रेस
प्रगती एक्सप्रेस
उद्या मुंबईहून-पुण्याकडे जाणाऱ्या या एक्सप्रेस रद्द
इंटरसिटी एक्सप्रेस