स्वबळावर 225 ते 250 जागा लढणार, सत्तेत बसणार: राज ठाकरे

कोणाशीही

कोणाशीही युती नाही; कोणत्याही परिस्थितीत सत्तेत बसणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024  साठी

रणशिंग फुंकलं.  विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने

Related News

राज ठाकरे यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी सकाळी मनसे नेत्यांकडून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला.

हा आढावा घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.

मनसे 225 ते 250 जागा लढणार आहे. यावेळेला मनसेचे पदाधिकारी काहीही करुन सत्तेत बसवणारच,

हे घडणार आहे, असा शब्द राज ठाकरे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिला. ते मुंबईत बोलत होते.

आपण सर्व्हे करतोय पक्षातील काही लोकं पाठवून.

पहिला सर्व्हे झाला,तुमच्या मतदारसंघात ते लोक येऊन गेलेत.

आता पुढे ते लोक येऊन तुम्हाला भेटतील, तुमच्या इथली परिस्थिती त्यांना सांगा.

निवडून येण्याची परिस्थिती असेल त्यालाच तिकीट मिळेल.

कोणालाही तिकीट दिले जाणार नाही, पैसे काढणाऱ्यांना तिकीट नाही.

जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्ष यांनी माहिती प्रामाणिकपणे द्या, दिलेली माहिती चेक केली जाईल, असं राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकं मला सत्तेत काही करून बसवायचे आहेत.

काही लोकं हसतील, पण ती गोष्ट घडणारच.

आपण सव्वा दोनशे जागा लढणार आहोतॉ. कोणतीही युती नाही.

1 ऑगस्टपासून महाराष्ट्र दौरा मी करणार आहे. यावेळी मी बैठका घेणार आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

येत्या दोन दिवसात दुसऱ्या सर्व्हेला आपले नेते येतील. निवडणुकीच्या तयारीला लागा, असं राज ठाकरे म्हणाले.

Read also: https://ajinkyabharat.com/heavy-rain-in-the-state-schools-and-colleges-closed-in-pune-district/

Related News