मतदारांसाठी मोठी बातमी; मार्करने लावलेली शाई लगेच पुसतेय? voting प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह
राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज सकाळपासून voting प्रक्रियेला सुरुवात झाली असून लोकशाहीच्या या उत्सवात नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होताना दिसत आहेत. राज्यातील तब्बल 29 महानगरपालिकांसाठी मतदान सुरू असून अनेक ठिकाणी पहाटेपासूनच voting केंद्रांवर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. मात्र, voting च्या पहिल्याच काही तासांत विविध ठिकाणी गोंधळाचे प्रकार समोर येऊ लागल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
काही voting केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक अडचणी, तर काही ठिकाणी voting यादीतून नावे गायब असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यामुळे अनेक मतदारांना मतदान न करता परत जावे लागल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, आणखी एक गंभीर आणि धक्कादायक बाब समोर आली असून त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मतदानानंतरची शाई पुसतेय? व्हिडीओ व्हायरल
voting केल्यानंतर मतदाराच्या बोटावर लावली जाणारी शाई ही दुबार voting टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते. आतापर्यंत निवडणूक आयोगाकडून वापरली जाणारी पारंपरिक न पुसली जाणारी शाई ही अनेक दिवस तशीच राहायची. मात्र, यंदाच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने मार्कर किंवा पेनद्वारे बोटावर खूण करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
Related News
याच निर्णयामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे. voting केल्यानंतर बोटावर लावलेली ही शाई साध्या नेलपेंट रिमुव्हरने किंवा हात चोळल्यावर सहज पुसली जात असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंमुळे दुबार मतदान होण्याची शक्यता निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सचिन सावंत यांचा व्हिडीओ चर्चेत
या संपूर्ण प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळालं आहे ते काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमुळे. सचिन सावंत यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत, स्वतःच्या बोटावरील शाई सहजपणे पुसली जात असल्याचा दावा केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी प्रत्यक्षात नेलपेंट रिमुव्हर वापरून बोटावरील शाई पुसून दाखवली आहे.
इतकंच नव्हे, तर त्यांनी आपल्या पत्नीच्या बोटावरील शाई देखील त्याच पद्धतीने पुसून दाखवत, “जर शाई एवढ्या सहजपणे निघत असेल, तर दुबार voting कसं रोखणार?” असा थेट सवाल निवडणूक आयोगाला केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
दुबार मतदानाची भीती, पारदर्शकतेवर प्रश्न
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका
या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पारंपरिक न पुसली जाणारी शाई का वापरली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनेकांनी हा निर्णय घाईघाईत आणि पुरेशी चाचणी न करता घेतल्याचा आरोप केला आहे. निवडणूक आयोगाने यावर तातडीने खुलासा करावा आणि गरज असल्यास त्वरित सुधारित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विविध राजकीय पक्षांकडून होत आहे.
आयोगाची भूमिका काय?
या प्रकरणावर अद्याप निवडणूक आयोगाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, वाढता वाद आणि सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडीओ पाहता, आयोगाला या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी लागणार आहे. आगामी काही तासांत आयोग कोणता निर्णय घेतो, पारंपरिक शाई वापरण्याबाबत काही निर्देश देतो का, की या आरोपांना फेटाळतो—याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेवरील विश्वास टिकवण्यासाठी निवडणूक आयोगाने तात्काळ आणि ठोस पावले उचलणे अत्यावश्यक असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.
read also:https://ajinkyabharat.com/ind-vs-nz-darryl-michelchi-bhartala-hit/
