स्वाती इंडस्ट्रीजचे काम बंद करा! -निलेश देव

सामाजिक

सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांचे अन्नत्याग आंदोलन! 

अकोला शहरातील मालमत्ता कर वसुलीचा ठेका

स्वाती इंडस्ट्रिजला देण्यात आला आहे.

Related News

मात्र हा ठेका गैर पद्धतीने देण्यात आला असल्याचा आरोप करीत

सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी स्वाती इंडस्ट्रीजचे काम बंद करण्याची

मागणी करत अन्न त्याग आंदोलन सुरू केल आहे.

स्वाती इंडस्ट्रिज सोबत झालेला करार महापालिका आयुक्त

व प्रशासकाने अकोलेकरांवर थोपलविला असल्याचा आरोप यावेळी देव यांनी केला.

हा करार रद्द करावा या मागण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता निलेश देव

यांनी राऊतवाडी चौकात उपोषण सुरू केल आहे.

या आधी सुद्धा या विषयी निलेश देव यांनी मुंबईत ठिय्या आंदोलन करत

पालकमंत्र्यांना निवेदन दिले होते.

ह्या आहेत प्रमुख मागण्या-

१. मालमत्ता कर वसुली खाजगी वसुलीस स्थगिती द्यावी.

२. चुकीच्या निविदेमध्ये अपहार करुन खाजगी वसुली बंद करावी.

३. मालमत्ता मुल्यांकनाचे काम सुरु न केल्याने एजन्सीचे सर्व कामे बंद करावे.

४. कोणत्याही प्रकारचा मालमत्ता असेसमेंट अनुभव स्वाती इंडस्ट्रिजला नाही

त्यामुळे टेंडर कसे दिले यांची चौकशी करावी.

५. शास्ती अभय योजनेपुर्वी पैसे भरलेल्या नागरिकांना दिलासा द्यावा.

६. मालमत्ता कर संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल प्रलंबित असताना

स्वाती इंडस्ट्रिजला काम कसे देण्यात आले याचा तपास करावा.

Read also: https://ajinkyabharat.com/nagpurat-imd-alert-regarding-excessive-rainfall/

Related News