राज्यात विधानसभा निवडणूका तोंडावर असतांना
उमेदवारी मिळवण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
विविध पक्षांकडून ईच्छुकांचे अर्ज मागवलेले आहेत.
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
अशातच अखिल भारतीय कॉग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य तथा
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष माजी मंत्री खा. चंद्रकांत हंडोरे यांचे निकटवर्तीय
व अकोला ग्रामिण जिल्हा काँग्रेस कमिटी प्रशासन व संघटन सरचिटणीस भूषण गायकवाड
यांनी मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे.
स्थानिक कॉग्रेस कार्यालयात त्यांनी ईच्छुक उमेदवारी अर्ज भरला आहे.
१९७८ पासून आतापर्यंत या मतदारसंघात भाजपा ५ वेळा कॉग्रेस ३ वेळा
राष्ट्रवादी कॉग्रेस १ वेळा व अपक्ष उमेदवार १ वेळा निवडणून आलेला आहे.
तसेच या मतदारसंघात काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग असून
भूषण गायकवाड यांची मतदारसंघातील सर्व समाजात मोठा संपर्क आहे.
तसेच सर्वांशी सलोख्याचे संबंध आहेत. व त्यांनी २०२४ लोकसभा निवडणूकीत
कॉग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांच्या प्रचारात मोठा पुढाकार घेतला होता
व बौद्ध समाजातील मतदान कॉंग्रेस पक्षाकडे वळविण्यात त्यांना मोठ्या प्रमाणात यश आले होते.
तसेच भूषण गायकवाड हे सहकार नेते सुनिल धाबेकर यांचे निकटवर्तीय असल्याने
यावेळी धाबेकर गट व मतदारसंघातील सहकार क्षेत्र भूषण गायकवाड
यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहील अशी चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे.
तसेच भूषण गायकवाड यांनी मतदारसंघात काँग्रेस पक्षाची मोठी फळी उभारली असून
पक्ष संघटनेत बळकटी आणली आहे. तसेच विविध आंदोलने, शिबिरे व उपक्रमांमुळे
त्यांच्याकडे युवावर्ग आकर्षित आहे. तसेच बौद्ध समाजातील युवा चेहरा म्हणून त्यांची ओळख असून
त्यांना कॉग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास यावेळी वंचित बहुजन आघाडीला
मात्र प्रतिस्पर्धी कॉंग्रेस पक्षच देऊ शकतो हे मात्र नक्की आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/100th-anniversary-olympics-in-paris/