वारकऱ्यांसाठी राबवली जाणार पेन्शन योजना ! राज्य सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्राला

महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभलेली आहे.

सध्या आषाढी वारी सुरू असून यानिमित्ताने लाखो भाविक विठ्ठलाचे

दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जात असतात.

Related News

अशातच राज्य सरकारने वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

परंपरेने महिनाभर वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धपकाळात

राज्य सरकारकडून पेन्शन दिली जाणार आहे.

या संदर्भातील शासन निर्णय हा मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या वतीने

जारी करण्यात आला आहे. पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी

आणि कीर्तनकारांसाठी कल्याणकारी योजना राबण्यासाठी

मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय रविवार (१४ जुलै) रोजी घेण्यात आला.

योजना आणि आरोग्य विमा योजना राबवली जाणार;

इंद्रायणी, चंद्रभागा, गोदावरी व इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी

उपाययोजना राबवणार; पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड,

पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर संस्थान, शेगाव, भगवानगढ,

अगस्तीऋषी, संत सावता माळी समाज मंदिर अरण व इतरही तीर्थक्षेत्रांचा विकास

या महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

या महामंडळाच्या माध्यमातून वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरवल्या जाणार आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%96%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b5/

Related News