विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर !

योग्य

योग्य ती कारवाई करणार – मुख्यमंत्री शिंदे

राज्यामध्ये विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे.

गडावर झालेल्या धार्मिक अतिक्रमणाच्या विरोधात

Related News

अनेक शिवप्रेमींनी आवाज उठवला आहे.

मागील अनेक महिन्यांपासून गड संवर्धन करणाऱ्या लोकांचे

व शिवभक्तांचे या संदर्भात आंदोलन सुरु आहे.

अगदी विधीमंडळासमोर देखील आंदोलन करण्यात आले आहे.

विविध माध्यमांतून विशाळगड बचाओ अशी मोहिम घेण्यात येत आहे.

विशाळगड अतिक्रमणाबाबत आज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज

कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

त्यांनी विशाळगडावर मोर्चा देखील काढला.

यानंतर अखेर राज्य सरकारने विशाळगड अतिक्रमण प्रकरणावर

प्रतिक्रिया देत कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

विशाळगड वाचवण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी

लाखो शिवभक्तांसह विशाळगड दौरा केला.

त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात सकाळपासून झाली असून

पावनखिंडीतून संभाजीराजे छत्रपती हे विशाळगडावर जाणार आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/establishment-of-chief-minister-warkari-mahamandal-by-shinde-government/

Related News