गोव्यातील मडगाव येथे दि. १८ व १९ डिसेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत मूर्तिजापूरच्या विनय मिलींद जामनिक याने उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई केली. या दमदार यशामुळे विनयची नेपाळ किंवा श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड निश्चित झाली आहे.
विनय जामनिक हा मूर्तिजापूर हायस्कूल, मूर्तिजापूर येथे इयत्ता सहावीत शिक्षण घेत असून तो ब्रम्ही (ता. मूर्तिजापूर) येथील रहिवासी आहे. अल्पवयातच राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विनयने आपल्या कौशल्याची ठसा उमटवला. स्पर्धेदरम्यान त्याने तांत्रिक अचूकता, वेग, ताकद आणि आत्मविश्वास यांचा प्रभावी संगम साधत परीक्षक व प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली.
ही यशस्वी कामगिरी एम.बी. कराटे संचालक व प्रमुख प्रशिक्षक सेन्सई गंगाधर जाधव तसेच प्रशिक्षक समीर जाधव यांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाल्याचे सांगण्यात आले. सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि कठोर मेहनतीचे हे फळ असल्याचे प्रशिक्षकांनी नमूद केले.
Related News
प्रत्येक नो-बॉलसाठी खेळाडू आणि कोचला दंड ठोठवा; सुनील गावस्कर भडकले, म्हणाले—‘तरच हे वठणीवर येतील’
Sunil Gavaskar On Test No Ball
Continue reading
खूपच आक्रमक आणि… ‘त्याला विचारण्याचा प्रयत्न केला’; अजिंक्य रहाणेने विराट कोहलीबाबत उघड केलं मोठं गुपित
भारतीय क्रिकेटमधील विश्वासार्ह फलंदाज म्हणून ओळ...
Continue reading
वैभव सूर्यवंशीची लॉटरी! दुलीप ट्रॉफीत उपकर्णधारपदाची संधी; आता कर्णधारपदासाठी मोठी तयारी?
दुलीप ट्रॉफीसाठी वैभव सूर्यवंशीवर निवड समितीचा मोठा विश्वास, भविष्यात नेतृत्वाची जबाबदारी...
Continue reading
CWG 2026 : “मी मैदानावर नसलो तरी भारताकडे दमदार भालाफेकपटू आहेत”; रौप्य पदकानंतर नीरज चोप्राचं मोठं विधान
कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये रौप्य जिंकल्यानंतर नीरज चोप्राचा आत्मविश्वास; ...
Continue reading
CWG 2026 : भारताची दमदार झेप! एका दिवसात 6 पदकांची कमाई; अस्मिता डेचा इतिहास, नीरज चोप्राला रौप्यावर समाधान
CWG 2026 : नवव्या दिवशी भारताची शानदार कामगिरी, एकूण पदकसंख्या 23 वर
ग...
Continue reading
Who is Saransh Jain : एकही IPL सामना न खेळता थेट टीम इंडियात एन्ट्री! गंभीरच्या लाडक्याची जागा घेत मध्य प्रदेशच्या या खेळाडूने मिळवली संधी
भारत ...
Continue reading
IND vs PAK : टीम इंडियाने पुन्हा पाकिस्तानला दिला धक्का; फायनलमध्ये 3-1 ने पराभव करत आशियाई चॅम्पियनशिपवर नाव कोरलं
भारत आणि पाकिस्तान यां...
Continue reading
IND vs ENG ODI Series : धक्कादायक! भारताविरुद्ध इंग्लंडचा 'हा' खेळाडू तिन्ही वनडेत NOT OUT; 249 धावांनी मालिकेचा खरा गेमचेंजर
मुंबई : भारत आणि इंग्...
Continue reading
Harsh Goenka यांच्या 'RoKo' पोस्टमुळे रोहित शर्मा, विराट कोहली, गौतम गंभीर, अजित अगरकर आणि जय शाह यांच्याबाबत चर्चांना उधाण आले आहे. रोहितच्या निव...
Continue reading
IND vs ENG 3rd ODI मध्ये भारताच्या Playing XI मध्ये तीन मोठे बदल करण्यात आले आहेत. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर असून केएल राहुल, अर्शदीप...
Continue reading
विराट कोहली News : सलग 2 शून्यांनंतर विराटचा जबरदस्त कमबॅक, अभिषेक नायरांनी सांगितला खास किस्सासलग दोन सामन्यांत शून्यावर बाद झाल्यानंतर विराट ...
Continue reading
विनयने आपल्या यशाचे श्रेय आजी गयाबाई जामनिक, वडील मिलींद जामनिक, आई शिल्पा जामनिक, नातेवाईक तसेच शाळेचे मुख्याध्यापक अनिल देविकर, वर्गशिक्षिका किरण भास्कर, शिक्षक दिनेश खलेलकर, अमित सोळंके व सर्व शिक्षकवृंद यांना दिले आहे.
विनयच्या या यशामुळे मूर्तिजापूर तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तो देशासाठी यश संपादन करेल, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/design-youth-parliament-2025-state-level-historical-record-of-akothya-students/