अकोला – अकोला गार्डन क्लब आणि महाबीज यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला येथील गोरक्षण रोडवरील शुभमंगल कार्यालयात २० व २१ डिसेंबर रोजी भव्य पुष्पप्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन २० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालक एस. भुवनेश्वरी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम उपस्थित राहणार आहेत.
अकोला गार्डन क्लबच्या अध्यक्ष संजय शर्माच्या मते, निसर्गप्रेमी आणि पुष्पप्रेमी नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. हा क्लब मागील ५१ वर्षांपासून अकोलामध्ये पुष्पप्रदर्शनाचे आयोजन करत आहे, तर यंदा हे ५२ वे वर्ष आहे. प्रदर्शनात १००० पेक्षा जास्त फुल व झाडांच्या जाती व प्रकार पाहायला मिळणार आहेत.
प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार असून शालेय विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांना भेट देण्याची संधी उपलब्ध आहे. या वर्षीच्या प्रदर्शनात महिला व मुलांकरता विविध गेम शो चे आयोजनही करण्यात आले आहे. तसेच फूड स्टॉल, घरगुती गार्डनसाठी लागणारे साहित्य आणि शोभिवंत फुलझड्यांचे स्टॉल विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत, अशी माहिती जेष्ठ पर्यावरण तज्ञ शरद कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Related News
गुलाब व शेवंतीसह नवनवीन फुलांच्या जाती, विविध रंगबिरंगी गुलाब, आकर्षक बोन्साय आणि औषधी गुणधर्म असलेली झाडे हे प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.अकोलेकरांनी या दोन दिवसीय पुष्पप्रदर्शनाचा लाभ घेण्याचे गार्डन क्लबचे सचिव श्याम गोटफोडे, माजी अध्यक्ष अजय सेंगर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/mumbai-traffic-update-western-express-highway-gambhir-kondi/
