ताजिकिस्तानात हिजाबवर बंदी !

भारतात

भारतात बुरख्यावर बंदी घालण्याची मागणी असतानाच

ताजिकिस्तान या मुस्लीम बहुल देशाने आपल्या नागरिकांना हिजाब घालण्यास बंदी घातली आहे.

या देशात पुरुषांनी दाढी ठेवण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे.

मध्य आशियातील मुस्लीमबहुल देशातच संसदेने हिजाब आणि

बुरख्यासारख्या इस्लामिक पोशाखावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

संसदेत याबाबत कायदा मंजूर करण्यात आला आहे.

आता या कायद्याची अंमलबजावणी होणार आहे.

त्यामुळे तेथे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

ताजिकिस्तानच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांनी

हे विधेयक 19 जून रोजी मंजूर केले आहे.

सभागृहाने कायदा मंजूर करताना या पोषाखाला “विदेशी” संबोधले.

याशिवाय ताजिकिस्तानने ‘ईदी’च्या सणादरम्यान

लहान मुलांच्या पैसे मागण्याच्या प्रथेवरही बंदी घातली आहे.

विशेष म्हणजे, सुमारे 1 कोटी लोकसंख्या असलेल्या ताजिकिस्तानमधील

96% पेक्षा जास्त लोक इस्लाम धर्माचे पालन करतात.

अध्यक्ष रुस्तम इमोमाली यांच्या नेतृत्वाखालील संसदेच्या

18 व्या अधिवेशनात कायद्यात बदल करण्यापूर्वी या विधेयकावर चर्चा करण्यात आली.

यादरम्यान, ताजिकिस्तान संसदेने म्हटले की,

महिलांनी चेहरा झाकणे अथवा हिजाब घालणे,

हा ताजिक परंपरा आणि संस्कृतीचा भाग नाही.

या कारणास्तव अशा विदेशी कपड्यांवर देशात बंदी घातली पाहिजे.

हा कायदा नुकताच दोन्ही सभागृहांनी मंजूर केला आहे.

आता हा कायदा लवकरच लागू करण्याचा सरकारचा विचार आहे.

मात्र, या विधेयकाबाबत देशाच्या विविध भागांतून अनेक आंदोलने होत आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/net-exam-paper-futla-darknet-uploadhi-jhala/