आडगाव मेडिकल चौक बनला अपघाताचा चौक , अतिक्रमण आणि रिक्षा थांब्यांमुळे वाहतूक कोंडी

आडगाव मेडिकल

 

नाशिक : आडगाव मेडिकल फाटा परिसरात अतिक्रमण, रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या रिक्षा आणि वाढती वाहतूक यामुळे हा चौक अपघातप्रवण ठरत असून येथे दररोज किरकोळ अपघातांच्या घटना घडत आहेत. नागरिकांकडून वेळोवेळी तक्रारी देऊनही संबंधित विभागांकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने परिसरातील रहिवाशी आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

या चौकाजवळ वसंतराव पवार महाविद्यालय, भुजबळ कॉलेज, डी-मार्ट, विविध हॉटेल्स तसेच मळे परिसरातील मोठ्या प्रमाणातील नागरिक आणि विद्यार्थी नेहमीच गर्दी असते. त्यातच रिक्षाचालक रस्त्यावरच रिक्षा उभ्या करतात. मुंबई–आग्रा महामार्गावर असलेला या चौकात वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात होते. रस्त्याच्या कडेला केलेले अतिक्रमण आणि अनियमित पार्किंगमुळे चालकांना अंदाज न आल्याने अपघात होत आहे.

Related News

शुक्रवारी झालेल्या अपघातात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला किरकोळ दुखापत झाली. त्यामुळे त्याला महाविद्यालयाला दांडी मारावी लागली. अशा घटना वारंवार घडत असल्याने अतिक्रमण हटवून रस्त्यावर रिक्षा उभ्या करण्यावर नियंत्रण आणावे, तसेच येथे कायमस्वरूपी पोलिस कर्मचारी नेमावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

ज्येष्ठ नेते आडगाव रामभाऊ जाधव यांनी प्रतिक्रिया देताना मत व्यक्त केल की
हा परिसर मुख्य रहदरीचा परिसर आहे. येथे विद्यार्थी, दवाखान्यातील रुग्ण, तसेच गावातील नागरिक बसची वाट पाहणत उभे राहतात. रस्त्यावरच गाड्या पार्क केल्याने नागरिकांना रस्त्यावर येऊन उभे राहावे लागते. त्यामुळे येथे दोन वाहतूक पोलीस कायमस्वरूपी चे नेमावे.

read also : https://ajinkyabharat.com/the-marriage-is-done-secretly-but-the-linga-of-bhairavi-chech-temple-is-selected-for-the-marriage/

Related News