ग्राम काजळेश्वर – वरखेड मध्ये पाणीबाणी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांचे उपोषण!

माहितीच्या अधिकारात माहिती देण्यास अधिकारी करतात टाळाटाळ.

 अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील

ग्राम काजळेश्वर-वरखेड या गावात तथा गावाच्या आसपास

Related News

भूगर्भात शास्वत पाणी पुरवठा करण्यायोग्य भूजल,

पाणी साठा उपलब्ध नसल्यामुळे

ग्राम काजळेश्वर-वरखेड येथील ग्रामस्थांना

पिण्याच्या पाण्याची फार मोठी समस्या

गेल्या अनेक वर्षा पासुन निर्माण झालेली आहे.

दगडपारवा धरणावरून काजळेश्वर-वरखेड गावाला

जल जीवन मिशन योजने अंतर्गत

पिण्याचे पाणी मिळण्याकरीता शेकडो ग्रामस्थांनी

अकोला जिल्हाधिकारी कार्यालय समोर

२०२२ मध्ये आंदोलन करून

जल जीवन मिशन अंतर्गत गावाकरीता ३,२४,६५,६०० रूपयांचा निधी

नळ योजने करीता

संबधीत अधिकाऱ्यांकडुन मंजुर करून घेतला होता

व सदर नळ योजनेच्या कामाचा कंत्राट

जी.डी. देशपांडे यांनी घेतला होता.

केलेल्या करारनाम्यानुसार

दिनांक १५ डिसेंबर २०२२ ते १५ डिसेंबर २०२३ पर्यंत

नळ योजनेचे काम पुर्ण करणे बंधनकारक होते,

मात्र मा. कार्यकारी अभियंता

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प. अकोला

व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग अकोला

यांचे वरदहस्ताने व आर्थिक संगनमताने

संबधीत शासकीय कंत्राटदार

जिल्हयातील विकासकामे निकृष्ट दर्जाचे करून

शासनाच्या करोडो रूपयांच्या निधीचा

अपहार करीत असल्याचे

कागदोपत्री पुराव्यावरून स्पष्ट होत असल्याचा

ग्रामस्थांचा आरोप आहे.

संबंधित कंत्राटदाराने केलेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून

अद्यापही पूर्ण झाले नसल्यामुळे

ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.

सदर प्रकरणात ग्रामस्थांनी

माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता

संबंधीत अधिकारी माहिती देण्यास

टाळाटाळ करत असल्याची माहिती उपोषणकर्त्यांनी दिली.

शासन निधीचा गैरकारभाराबाबत

संबधीत शासकीय कंत्राटदाराचा परवाना ब्लॅक लिस्ट करून,

संबधीत दोषी अधिका-यांवर बडतर्फीची कार्यवाही व्हावी

व काजळेश्वर – वरखेड गावातील नागरीकांची

पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लागावी

या मागण्यांकरिता भिमसागर आत्माराम इंगळे

व महादेवराव हरिचंद्र इंगळे पाटील हे ग्रामस्थ

आजपासून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर

आमरण उपोषणाला बसले आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/chhagan-bhujbal-resigns-as-minister-and-leaves-junya-pakshat/

Related News