मॉन्सून दोन दिवसांपासून अमरावती, चंद्रपूर भागातच मुक्कामी आहे.
त्याची पुढची वाटचाल मंदावलेली आहे.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबई :राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) सुमारे ३५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुकारलेला २३ दिवसांचा बेमुदत संप अखेर आज मागे घेण्यात आला. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोब...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
आतापर्यंत मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मराठवाडा आणि
मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मजल मारली आहे.
परंतु, दोन दिवसांपासून मॉन्सूनमध्ये प्रगती झालेली दिसत नाही.
अजून तीन-चार दिवस तरी प्रतीक्षा करावी लागेल,
असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, सातारा, सिंधुदुर्ग, रायगड या घाट विभागात वादळवाऱ्यासह पावसाचा इशारा
दिल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे.
सध्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी विदर्भातील अमरावती आणि
चंद्रपूर पर्यंतच्या भागापर्यंत मजल मारलेली आहे.
पण त्यानंतर मॉन्सूनची चाल मंदावलेली पाहायला मिळत आहे.
वाऱ्यांच्या प्रगतीसाठी आणखी तीन ते चार दिवस वाट पाहावी लागेल.
मोसमी वाऱ्यामध्ये ऊर्जा नसल्याने ते भरून येण्यासाठी वेळ लागेल.
खरंतर यंदा अरबी समुद्रावरून मॉन्सूनचा प्रवास वेगाने झाला होता.
केरळमध्येदेखील दोन दिवसांपूर्वी हजेरी लावली.
त्यानंतर मॉन्सून महाराष्ट्रात ६ जून रोजी दाखल झाला,
तर ८ जून रोजी पुणे, धाराशिव, नांदेड, लातूर या जिल्ह्यांच्या काही भागात पोहोचला.
९ जून रोजी मुंबईसह, ठाणे, पुणे, नगर, बीड जिल्ह्यांच्या बहुतांश भागात मजल मारली.
आता तर मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व्यापला आहे.
विदर्भामध्ये बुधवारी (दि. १२) पश्चिम विदर्भाच्या आणखी काही भागात
मॉन्सून पोहोचला होता, १४ जूनपर्यंत वाटचाल सुरू होती.
पण दोन दिवसांपासून ती मंदावलेली आहे.
सध्या बंगालच्या उपसागरावरून मॉन्सूनचे प्रवाह क्षीण झाल्याचे दिसून येत आहे.
त्यातच अरबी समुद्रावरून मॉन्सूनची वाटचाल मंद झाली आहे.
पुढील तीन ते चार दिवसांत मॉन्सून पुढे वाटचाल करण्यासाठी
पोषक वातावरण तयार होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
या जिल्ह्यांना येलो अलर्ट !
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, विदर्भात काही भागात विजांच्या कडकडाटासह
पावसाचा अंदाज आहे.
१७ ते १९ जून रोजी विदर्भातील सर्व जिल्हे,
नांदेड वगळता सर्व मराठवाडा,
सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर या भागात वादळवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.
रायगड, सिंधुदुर्ग, सातारा घाट विभागात देखील येलो अलर्ट आहे.
Read also: पश्चिम बंगालमध्ये कंचनजंगा एक्स्प्रेसचा भीषण अपघात. (ajinkyabharat.com)