अमेरिकेचे सुपर ८ चे स्वप्न साकार
अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामना धुवाधार पावसामुळे रद्द झाला
आणि पाकिस्तानच्या सुपर ८ फेरी गाठण्याच्या आकांक्षांवर पाणी फेरले गेले.
Related News
निक पत्रकार नंदन प्रतिमा शर्मा बोर्डोलोई यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये,
फाटलेल्या नोटांमध्ये अडकलेला एक मृत उंदीर स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ...
Continue reading
नवी दिल्ली :
भारतीय आणि जागतिक इतिहासात १६ एप्रिल ही तारीख अनेक मोठ्या आणि ऐतिहासिक घटनांसाठी ओळखली जाते.
या दिवशी भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास झाला होता, ज्याने देशातील परिव...
Continue reading
तेल्हारा (तालुका प्रतिनिधी):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने तेल्हारा येथे भव्य
आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. ९ एप्रिल २०२५ रो...
Continue reading
अलीगड (उत्तर प्रदेश),
14 एप्रिल 2025 – अलीगडमधील अतरौली शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये देवी-देवतांचे चित्र असलेल्या
कागदी नैपकिनचा वापर केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
या ...
Continue reading
राजुरा घाटे येथे आढळली दुर्मीळ पांढरी चिमणी.
मुर्तिजापूर : मुर्तिजापूर तालुक्यातील राजुरा घाटे येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील पक्षीमित्र
शिक्षक श्री. मनोज लेखनार हे गेल्या...
Continue reading
नवी दिल्ली:
दिल्ली मेट्रोमध्ये प्रवासादरम्यान काही महिला प्रवाशांनी फर्शावर बसून भजन-कीर्तन सुरू केले.
या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यावर नेटकऱ्यांच्या मि...
Continue reading
गुरुग्राम (हरियाणा):
दिल्लीच्या शेजारील गुरुग्राममधील नामांकित खासगी रुग्णालयात एका एअर होस्टेसवर
वेंटिलेटरवर असतानाच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पीडित महि...
Continue reading
नवी दिल्ली /
अकोला — "उर्दू ही एक लोकभाषा आहे, ती कोणत्याही विशिष्ट धर्माशी जोडलेली नाही.
तसेच, मराठीबरोबर उर्दूचा वापर करण्यावर कोणताही कायदेशीर प्रतिबंध नाही,
" अशा स्पष्ट शब...
Continue reading
नवी दिल्ली / नाशिक:
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
आता रेल्वे प्रवासादरम्यानही एटीएममधून पैसे काढणे शक्य होणार आहे.
देशात प्रथमच चालत्या गाडीत एटीएम...
Continue reading
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमरावती विमानतळ आणि सेवा लोकार्पण; 18 एप्रिलपासून नियमित सेवा सुरू
अमरावती (18 एप्रिल 2025):
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
मुंबई-अमरावती...
Continue reading
महानगरपालिकेचे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
अकोला (15 एप्रिल 2025) –
अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा जलप्रकल्पातील साठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.
त्यामु...
Continue reading
नाशिक (16 एप्रिल 2025) – नाशिक महानगरपालिकेने अनधिकृत ठरवलेल्या
काठे गली सिग्नल परिसरातील सातपीर दर्गा हटविण्याच्या कारवाईसाठी गेलेल्या महापालिका
आणि पोलिस पथकावर काल रात्री दगडफ...
Continue reading
गटवार लढतीत नवख्या अमेरिकेकडूनच पाकिस्तानचा अनपेक्षित पराभव झाला होता.
त्या पराभवातून पाकिस्तानचा संघ सावरलाच नाही.
पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्धच्या थरारक लढतीतही त्यांचा पराभव झाला
आणि त्यांच्या सुपर ८ च्या आशा मावळू लागल्या.
अमेरिका आयर्लंड सामन्यावर पाकिस्तानचे पुढच्या फेरीचे स्वप्न अवलंबून होते;
मात्र पावसामुळे ही लढत होऊच शकली नाही.
पंचांनी सातत्याने मैदानाची पाहणी केली.
मात्र मैदान खेळण्यायोग्य नसल्याने पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
अमेरिकेने सलामीच्या लढतीत कॅनडावर ७ विकेट्सनी विजय मिळविला.
पाकिस्तानविरुद्धची त्यांची लढत टाय झाली;
मात्र सुपर ओव्हरमध्ये त्यांनी बाजी मारली.
बलाढ्य भारतीय संघालाही त्यांनी टक्कर दिली; पण त्यांना विजय मिळवता आला नाही.
आयर्लंडविरुद्धची लढत रद्द झाल्याने अमेरिकेचे ४ सामन्यांनंतर ५ गुण झाले आ
णि सुपर८ फेरीतला प्रवेश पक्का झाला.
अ गटातून भारत आणि अमेरिकेचा संघ सुपर ८ फ रीत दाखल झाला आहे.
पाकिस्तान, आयर्लंड यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
ब गटातून ऑस्ट्रेलियाने सुपर८ फेरी गाठली आहे.
दुसऱ्या स्थानासाठी इंग्लंडचा संघ दावेदार आहे.
क गटातून वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानने दिमाखात सुपर८ फेरीत वाटचाल केली आहे.
अफगाणिस्तानच्या झंझावातामुळे न्यूझीलंडसारख्या मोठ्या संघाला गाशा गुंडाळावा लागला आहे.
ड गटातून दक्षिण आफ्रिकेने सुपर८ फेरीत आगेकूच केली आहे.
दुसऱ्या स्थानासाठी बांगलादेश आणि नेदरलँड्स यांच्यात चुरस आहे.
या गटातून श्रीलंकेवर परतीची वेळ ओढवली आहे.
२००७ मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या टी वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानने फायनलमध्ये धडक मारली होती.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने त्यांना हरवत जेतेपदाची कमाई केली.
दोनच वर्षात झालेल्या चुकातून शिकत सुधारत पाकिस्तानने टी वर्ल्डकपच्या जेतेपदावर कब्जा केला.
त्यानंतर २०१० आणि २०१२ स्पर्धेत त्यांनी सेमी फायनलमध्ये आगेकूच केली होती.
२०१४ आणि २०१६ मध्ये त्यांचं आव्हान दुसऱ्या फेरीतच आटोपलं.
पाच वर्षानंतर २०२१ मध्ये पुन्हा एकदा त्यांनी सेमी फायनलमध्ये मुसंडी मारली.
२०२२ स्पर्धेत त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.
यंदा मात्र अंतर्गत बंडाळ्यांनी ग्रस्त पाकिस्तान संघाला प्राथमिक फेरीतूनच परतावं लागणार आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/cyril-ramaphosa-second-term-as-president-of-south-africa/