तिक्ष्णगतच्या पोस्टर प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
बाल कामगार विरोधी दिनानिमित्त चर्चासत्रात न्यायमूर्ती पैठणकर यांचे प्रतिपादन
Related News
‘तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीतर्फे बालकांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात.
बाल कामगार विरोधी दिनानिमित्त आयोजित पोस्टर प्रदर्शन
व चर्चासत्राचे आयोजन प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती योगेश पैठणकर यांनी केले.
यावेळी आयोजित कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती योगेश पैठणकर
यांच्यासह जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी गिरीश पुसदेकर,
अकोला जिल्हा बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष अॅड. अनिता गुरव,
सदस्य डॉ. विनय दांदळे, राजेश देशमुख,
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य अॅड. संजय सेंगर,
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाऊडकर,
अॅड. नितीन धुत, तिक्ष्णगत संस्थेचे सचिव विष्णुदास मोंडोकार,
दैनिक अजिंक्य भारतचे संपादक रूबेन वाळके,
तिक्ष्णगत संस्थेचे सदस्य श्रीकांत पिंजरकर,
अश्विन शिरसाट यांची उपस्थिती होती.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा महिला व बाल विकास विभाग तसेच
तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने
सम्यक संबोधी संस्थेच्या सम्यक विहार येथे १४ जून रोजी भव्य पोस्टर प्रदर्शन
व चर्चासत्र उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.
त्यानंतर बाल कामगार विरोधी दिनानिमित्त आयोजित पोस्टर प्रदर्शनामधील विजेता स्पर्धकांना
पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
मुलांना आपले विचार मुक्तपणे आणि कलात्मक पद्धतीने मांडता यावेत,
यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती.
स्पर्धेत १० ते १५ व १६ ते २५ वयोगटातील मुला-मुलींनी सहभाग घेतला.
दोन्ही गटातील प्रत्येकी तीन स्पर्धकांना प्रथम ३००१, द्वितीय २००१, तृतीय १००१ रुपये रोख
पारितोषिकांची लयलूट केली.
यावेळी दोन्ही गटातील प्रत्येकी तीन स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजिंक्य भारतचे व्यवस्थापक आशिष वानखडे,
सूत्रसंचालन अजिंक्य भारतच्या संचालिका जया भारती
तर कार्यक्रमाचे आभार यश साळवे यांनी मानले.
कार्यक्रमाकरिता श्वेता शिरसाट, उमेश शिरसाट, विशाल शिंदे, गोपाल बदरखे, सुचिता घोगरे,
सपना म्हात्रे, सनी वाळके, यश साळवे, करण पळसपगार यांनी अथक परिश्रम घेतले.
विजेत्या स्पर्धकांची नावे
बाल कामगार विरोधी दिनानिमित्त आयोजित पोस्टर प्रदर्शनात
१०२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
यामध्ये १० ते १५ वयोगटातील
प्रथम क्रमांक वेदांत ढोरे, द्वितीय मथुरा पाटकर तर
तृतीय क्रमांक मधुर गवई याने पटकाविला.
१६ ते २५ वयोगटात श्रद्धा गायकवाड हीला प्रथम,
मोहिनी विश्वकर्मा हीला द्वितीय व
संजना प्रजापती हीला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
तर उत्तेजनार्थ बक्षीस कार्तिक चव्हाण, पियुरा काकडे, साहूल दांदळे (१० ते १५)
व कृत्तिका मंडेवार, कबीर इंगळे (१६ ते २५) यांना मिळाले.
Read also: मोदींच्या सभेचा “मविआ” ला फायदा! शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला (ajinkyabharat.com)