दुध समजून चिमुकल्याने ड्रेन क्लिनर पिले; गंभीर दुखापत, पालकांचे जगच कोसळले!

दुध समजून

ब्रिटनमधील बर्मिंघम शहरात घडलेली एक घटना सर्व पालकांसाठी मोठा धक्का ठरली आहे. अवघ्या 13 महिन्यांच्या बाळाने चुकून ड्रेन क्लिनर पिल्याने त्याच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाले असून, त्याच्या आवाजावरही मोठा परिणाम झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

कशी घडली घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, या घरात त्या दिवशी आई बाथरुमची साफसफाई करत होती. साफसफाई करताना तिने वापरत असलेले ड्रेन क्लिनर एका बॉटलमध्ये ठेवले होते. ड्रेन क्लिनरचा रंग पांढरा असल्याने तो बाळाला अगदी दुधासारखा दिसला. आईचे काही क्षण दुर्लक्ष होताच बाळाने ती बॉटल उचलली आणि थेट तोंडाला लावून पिऊन टाकली.

बाळाची अन्ननलिका आणि जिभेला गंभीर इजा

ड्रेन क्लिनर हे अत्यंत रासायनिक व ज्वलनशील द्रव्य असते. ते पोटात किंवा तोंडात गेल्यानंतर अवघ्या काही सेकंदांतच शरीराचे आतील भाग जाळायला सुरुवात होते.
या बाळाच्या बाबतीतही तेच झाले.

Related News

  • अन्ननलिकेला खोलवर दुखापत झाली

  • जिभा आणि ओठांवर जखमा तयार झाल्या

  • काही मिनिटांत बाळाचा त्रास वाढू लागला

बाळाची आई हादरून धाव घेत डॉक्टरांकडे पोहोचली. तातडीने उपचार सुरू करण्यात आले.

उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे उपचार सुरू असताना या चिमुकल्याला हृदयविकाराचा झटका (Cardiac Arrest) आला. डॉक्टरांच्या वेगवान प्रयत्नामुळे त्याचा जीव वाचला असला तरी त्याची प्रकृती खूपच नाजूक होती.

आवाज कायमस्वरूपी जाण्याची भीती

बाळाचे वडील नदीन अलशमेरी सांगतात की –”ही घटना यंदाच्या मे महिन्यात घडली. अजूनही आमचे बाळ नीट बोलू शकत नाही. त्याचे ओठ आणि जीभ यांना झालेली दुखापत गंभीर असून डॉक्टरांचा अंदाज आहे की यामुळे त्याचा आवाज कदाचित पुन्हा पूर्णपणे येणारच नाही.

बाळ एक वर्षाचे होऊनही फक्त हलकासा आवाज काढण्याचा प्रयत्न करत आहे, पण आवाज स्पष्ट येत नाही. पुढील काही वर्षांतच परिस्थिती स्पष्ट होणार आहे.

पालकांची हतबलता व पश्चात्ताप

ही घटना घडल्यापासून पालक मानसिकदृष्ट्या खूप खचले आहेत.आई सतत स्वतःला दोष देत असून म्हणते,”फक्त काही सेकंद माझे लक्ष दुसरीकडे गेले आणि तोच आमचे आयुष्य बदलून गेले.”

अशा घटना टाळण्यासाठी पालकांनी काय करावे?

तज्ज्ञांच्या मते घरात असणारी रासायनिक व साफसफाईची द्रव्ये ही मुलांच्या हातापासून 100% दूर, लॉकमध्ये ठेवावीत.

  • अॅसिड, ड्रेन क्लिनर, ब्लीचिंग पावडर, फिनाईल

  • औषधे

  • केरोसिन, पेट्रोल

  • इतर रासायनिक पदार्थ

ही सगळी द्रव्ये मुलांना दूध किंवा पाण्यासारखी वाटू शकतात.रंग, वास आणि पॅकिंगमुळे 1-3 वर्षांची मुले सहज भ्रमित होतात.

शेवटी काय?

ही घटना जगभरातील पालकांसाठी एक धडा आहे.मुलांचे दुर्लक्ष फक्त काही सेकंदही गंभीर दुर्घटना घडवू शकते.सध्या या बाळावर उपचार सुरू आहेत आणि पालकांना एकच आशा —
त्यांचे बाळ पुन्हा एकदा बोलू शकेल का?

read also : https://ajinkyabharat.com/mother-radicalises-son-shocking-incident-unearthed-in-kerala/

Related News