जलकुंभ कोसळला, चिचारीत हाहाकार! संग्रामपूर तालुक्यातील घटना

संग्रामपूर तालुक्यातील

संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या

ग्राम चिचारी येथे बुधवारी रात्री नव्याने बांधकाम सूरू असलेली पाण्याची टाकी

Related News

जमिनदोस्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना संग्रामपुर तालुक्यातील लाडणापूर गट ग्रामपंचायत मध्ये

समाविष्ट आदिवासी ग्राम चिचारी येथे घडली आहे.

अत्यंत निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून उभारण्यात आलेली ही टाकी

काही मिनिटातच कोसळल्याचा आरोप होतो आहे.

या घटनेमुळे पंचायत समितीतील अधिकाऱ्यांचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

सुदैवाने टाकी रात्रीच्या वेळी कोसळल्याने जीवित हानी झाली नाही.

प्राप्त माहितीनुसार जल जविन मिशन योजनेअंतर्गत

आदिवासी ग्राम चिचारी येथे १ लाख ५० हजार लिटर क्षमतेची

गावाला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी उभारण्यात येत असून

तीची किंमत २९ लाख ७५ हजार ६७५ रुपये एवढी आहे.

डिसेंबर २०२३ पासून या टाकीचे बांधकाम सुरू असून

सद्यस्थितीत बांधकाम अंतिम चरणात असल्याची माहिती आहे.

ही टाकी समुद्रसपाटीपासून १२ मीटर उंच आहे.

या पाण्याच्या टाकीचे बांधकाम पुर्ण होण्याअगोदरच संपूर्ण टाकी जमिनदोस्त झाल्याने

आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

यामुळे संबंधित ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट कामाची बिल थांबवण्यात यावे

अशी मागणी चिचारी ग्रामवासियांकडून करण्यात येत आहे.

सदर प्रक्रणाविषयी संग्रामपूर पंचायत समितीचे

शाखा अभियंता यु.आर.कोरडे यांना विचारले असता त्यांनी

टाकीचे बांधकाम नियमानुसार सुरू होते.

या घटनेची सखोल चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार असून

टाकी कोसळण्याचे कारण चौकशीअंती समोर येणार असल्याचे सांगितले.

Read also : https://ajinkyabharat.com/departure/

Related News