भारताला या राष्ट्राचा मोठा धक्का , घेतला सर्वात मोठा निर्णय; आता हजारो भारतीयांना…

डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे अमेरिका आणि भारत यांच्यात तणावची स्थिती आहे. असे असताना आता आणखी एका देशाने मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे.

Iran Free Visa Policy : गेल्या काही दिवसांपासून जागतिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. व्यापार तूट भरून काढण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफसारखे बंधनं लादलेले आहेत. ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फस्ट’ या धोरणामुळे भारतासह सर्वच देशांनी खनिज, उद्योग तसेच अन्य बाबींमध्ये कसे स्वयंपूर्ण होता येईल यासह आपापल्या नागरिकांना सुरक्षित कसे करता येईल, त्यासाठी सर्वच देशांकडून प्रयत्न चालू आहेत. अनेक देशांनी अलिकडच्या काळात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. असे असतानाच आता भारताला मोठा झटका बसला आहे. मुस्लीन देशाने भारताबाबत आपले धोरण बदलले आहे. त्याचा परिणाम आता भविष्यात दिसणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इराण या मुस्लीम राष्ट्राने भारतीयांसाठी मोठ्या निर्णयाची घोषमा केली आहे. या निर्णयानुसार इराणने पासपोर्ट असणाऱ्या भारतीय नागरिकांसाठीची मोफत व्हिसाची सुविधा थांबवली आहे. भारतातून दरवर्षी अनेक लोक इराणमध्ये येतात. त्यांना खोटी आश्वासनं दिली जातात. इराणमध्ये गेल्यानंतर आम्ही तुम्हाला अन्य देशात पाठवू असे सांगितले जाते. त्यानंतर अशा भारतीय नागरिकांची पुढे फसवणूक होते. या फसवणुकीच्या काही घटना समोर आल्या आहेत. हीच बाब लक्षात घेऊन इराणने मोफत व्हिसाची सुविधा थांबवली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही याबाबत सोमवारी (17 नोव्हेंबर) माहिती दिली आहे.

फसवणूक, खंडणी मागितल्याचे प्रकार समोर

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितल्यानुसार भारतातील अनेक नागरिकांना खोटी आश्वासने दिली जातात. आम्ही तुम्हाला इराणमार्गे अन्य देशात पाठवू, नोकरी देऊ असे सांगितले जाते. त्यानंतर मात्र अनेक भारतीय नागरिकांसोबत फसवणूक, खंडणी मागितल्याचे प्रकार समोर आले आहेत. भारतीयांना अंधारात ठेवण्याात आले. ही बाब लक्षात घेऊन इराणने व्हिसाबाबत निर्णय घेतल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार इराणी सरकारने भारतातील सामान्य पासपोर्ट धारकांसाठीची व्हिसामधील सूट बंद केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 22 नोव्हेंबर 2025 पासून केली जाईल. इराणच्या मोफत व्हिसा धोरणाचा गुन्हेगारी प्रवृत्तींना फायदा होऊ नये तसेच. या सुविधेचा दुरुपयोग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सोबतच तुम्हाला इराणमध्ये कोणी नोकरी देण्याचे आश्वासन देत असेल तर वेळीच खबरदारी घ्या, असे आवाहन भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. त्यामुळे आता इराणने मोफत व्हिसा धोरण रद्द केल्यामुळे नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

read alsohttps://ajinkyabharat.com/prem-chopra-health-update-prem-chopras-condition-improves-90-year-old-senior-actor-discharged-from-lilavati-hospital/