पद्मश्री मिलिंद कांबळे यांना NIT श्रीनगर अध्यक्षपदाचा कार्यभार
पुणे – दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) चे संस्थापक आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) जम्मू चे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्याकडे महामहिम राष्ट्रपती यांच्या सूचनेनुसार नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) श्रीनगर (जम्मू व काश्मीर) चे अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
गेल्या दहा वर्षांपासून पद्मश्री कांबळे IIM जम्मू चे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचा नवीन परिसर जलद गतीने विकसित होत असून, शैक्षणिक गुणवत्ता आणि व्यवस्थापनात नवनवीन सुधारणा राबविल्या जात आहेत.
पद्मश्री कांबळे भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध समित्यांवर सल्लागार म्हणून महत्त्वाचे कार्य करत आहेत. त्यांच्या अनुभवामुळे NIT श्रीनगरच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात नवे प्रकल्प राबविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचा विकास आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रशिक्षणात सुधारणा होईल, अशी दृष्टी या नेमणुकीमागे दिसून येते.
read also : https://ajinkyabharat.com/bitcoin-price-falls-7-shocking-reasons-bitcoin-price-fell-from-90000-dollars/
