बाळापूर : तालुक्यातील वाडेगाव येथे स्टेट बँक ऑफ इंडिया समोर घडलेल्या धक्कादायक चोरीप्रकरणाने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दिनांक 18 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात 2 लाख 80 हजार रुपये क्षणार्धात लंपास करण्यात आल्याची माहिती समोर आली असून संपूर्ण प्रकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाडेगाव येथीलच 40 वर्षीय शेख मुद्दसिर शेख असलम कुरेशी यांनी SBI बँक आणि त्याच शेजारील एटीएममधून मिळून 2 लाख 80 हजार रुपये काढले. त्यांनी पैसे ठेवलेली पिशवी गाडीच्या पुढील भागावर ठेवून निघण्याची तयारी सुरू केली असतानाच तोंडाला रुमाल बांधून तीन ते चार संशयित युवक त्यांच्या जवळ आले.
“तुमचे काही पैसे खाली पडलेत,” असे सांगत त्यांनी लक्ष विचलित केले. पीडित व्यक्ती गाडीकडे पाहण्यासाठी खाली उतरले तोच बाजूलाच उभे असलेले दुसरे युवक गाडीवरील पैशांची पिशवी उचलून पोबारा करत पळून गेले. हा प्रकार बँकेसमोर उसळलेल्या गर्दीतच घडला.
Related News
राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट; तिघांना क्लिनचिट, चार्जशीटमधून नेमकं काय समोर आलं?
उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात मोठी अपडेट समोर आल...
Continue reading
केतन अग्रवाल प्रकरणात नवे धक्कादायक दावे; सिया गोयल आणि चेतन चौधरीबाबत तपासात समोर आले नवे तपशील
पुण्यात चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे अनेक...
Continue reading
अमायरा प्रकरण: 9 वर्षांच्या चिमुरडीने 5 वेळा मागितली मदत, शिक्षिकेने डावलले; CCTV फुटेजमधून समोर आला शेवटचा 48 फूटांचा प्रवास
राजस्थानातील जयपूर येथील एका नामांकित...
Continue reading
धावत्या स्कूल व्हॅनमधून 4 मुले रस्त्यावर पडली; CCTV फुटेज व्हायरल, सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
बंगळुरू: शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आ...
Continue reading
दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा आगीचा कहर; नोएडातील 12 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग, 6 अग्निशमन गाड्यांची धाव
दिल्ली-एनसीआर परिसरात आगीच्या घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. मालव...
Continue reading
अकोला शहरातील गीता नगर परिसरातील एका ओपन स्पेसमध्ये असलेल्या झाडांना अचानक भीषण आग लागल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात उसळत असल्याने तसेच धुराचे ल...
Continue reading
Hingoli Earthquake : मोठा गूढ आवाज आला अन् जमीन हादरली; 3.5 रिश्टर स्केलच्या भूकंपाने हिंगोलीतील गावांमध्ये भीतीचे वातावरण
हिंगोली : मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात रविवारी दुपारी...
Continue reading
अजित पवारांच्या शेवटच्या सीसीटीव्ही फुटेजवरून उठलेल्या शंका; सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया
अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण राजकीय विश्व हादरले आहे. हा अपघात इतका गंभीर हो...
Continue reading
डोंबिवली पूर्वेकडील लोढा हेवन हायप्रोफाईल सोसायटीत एक भयंकर प्रकार घडला आहे. योगी कुटुंब आपल्या घराच्या पाठीमागील चेंबरची साफसफाई करत असताना शेजारी तिवारी कुटुंबीयांनी त्या कामावर ...
Continue reading
कल्याणमधून खळबळजनक बातमी समोर आली आहे. आंबिवली पाटील नगर परिसरात रात्रीच्या वेळी नागरिकांच्या घरांवर सुतळी बॉम्ब फेकल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण ...
Continue reading
अकोट – शहरातील २५० वर्ष जुने श्री. कालंका माता मंदिर काल रविवारी धाडसी चोरीस त्रस्त झाले. शिवाजीनगर मोठे मार्ग येथील या प्रसिद्ध मंदिरात अज्ञात चोरट्याने देवीच्या अंग...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख संजय तुळशीराम कोकाटे (...
Continue reading
घटनेची माहिती मिळताच वाडेगाव पोलीस चौकीचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक संभाजी हिवाळे आणि त्यांचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासून सविस्तर माहिती गोळा केली. तर बाळापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. वृत्त लिहेपर्यंत पोलिसांकडून पंचनामा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
एका महिन्यात दुसरी मोठी घटना ! गावात भीतीचं सावट
वाडेगाव परिसरात अशा प्रकारच्या चोरीच्या सलग घटना घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच गावात साधारण महिन्याभरापूर्वी मटन विक्रेत्याच्या दुकानासमोर पातूर तालुक्यातील तुलंगा येथील बाळू मामनकार यांच्या दुचाकीवर ठेवलेली पैशांनी भरलेली पिशवी लंपास करण्यात आली होती. त्यात तब्बल 2 लाख रुपये गेले होते.
ताज्या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण अधिकच दाटले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. पोलिसांनी संशयितांचा तपास गतीने सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींच्या हालचालींचा शोध घेतला जात आहे.
read also : https://ajinkyabharat.com/delhi-blast-case-gruesome-conspiracy-exposed-shocking-revelation-by-accused-doctor-who-created-a-bloody-riot-using-signal-app/