मोदी सरकारचा पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी..

मोदी सरकार

नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

आज त्यांनी पंतप्रधान पदाचा पदाभार स्वीकारला आहे.

त्यांनी आज पंतप्रधान म्हणून पहिली सही शेतकऱ्यांसाठी केली आहे.

Related News

त्यांनी शेतकरी सन्मान निधीचा हप्ता जारी केला आहे.

त्याचा फायदा देशभरातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.

या निर्णयामुळे देशातील

कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपये जमा होणार आहेत.

यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की,

“आम्ही शेतकऱ्यांच्या विकास

आणि कल्याणासाठी कटीबद्ध आहोत.

कृषी क्षेत्रासाठी सातत्याने काम करत राहणार आहोत.”

१ डिसेंबर २०१८ रोजी

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली.

या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना

शासनाकडून दरवर्षी ६००० रुपयांची रक्कम दिली जाते.

प्रत्येकी २००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये ही रक्कम

शेतकऱ्यांना दिली जाते.

जी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाते.

सुरुवातीला या योजनेंतर्गत केवळ २ हेक्टर जमीन असलेल्या

शेतकऱ्यांनाच लाभ मिळत होता,

परंतु आता देशातील सर्व शेतकरी

पंतप्रधान सन्मान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकतात.
किसान सन्मान निधीचे आतापर्यंत १६ हप्ते जारी करण्यात आले आहेत.

१६ वा हप्ता प्रधानमंत्री मोदी यांनी यावर्षी २९ फेब्रुवारी रोजी

९.९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला.

पीएम-किसानचा १६ वा हप्ता मिळालेल्या ९.०९ कोटी शेतकऱ्यांपैकी

सर्वाधिक २.०३ कोटी शेतकरी उत्तर प्रदेशातील आहेत,

त्यानंतर महाराष्ट्र ८९.६६ लाख, मध्य प्रदेश ७९.३९ लाख,

बिहार ७५.७९ लाख आणि राजस्थान मध्ये ७५.७९ लाख शेतकरी आहेत.

Read also : मै नरेंद्र दामोदरदास मोदी…तिसऱ्यांदा घेतली प्रधानमंत्रीपदाची शपथ (ajinkyabharat.com)

Related News