टीम इंडियाचा 6 धावांनी थरारक विजय!!

टीम इंडियाचा 6 धावांनी थरारक विजय!!

टी-20 वर्ल्ड कपमध्ये 19 वा सामना

भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला.

साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष हे टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान

Related News

या हायव्होल्टेज सामन्याकडे लागून होतं.

या सामन्यात टीम इंडियाने

पाकिस्तानवर 6 धावांनी थरारक विजय मिळवून

पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर कब्जा केला आहे.
या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय होता,

तर पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव होता.

या विजयासह टीम इंडिया सुपर-8 मध्ये पोहोचणार

हे जवळपास निश्चित झाले आहे.

त्याचवेळी पाकिस्तानवर सुपर-8 मधून

बाहेर पडण्याचा धोका आहे.

काल झालेल्या सामन्यात टीम इंडियाने

पाकिस्तानला विजयासाठी 120 धावांचं आव्हान दिलं होतं.

पाकिस्तानच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला 19 ओव्हरमध्ये 119 धावांवर गुंडाळलं.

त्यामुळे पाकिस्तानच्या विजयाची आशा जागली होती.

पाकिस्तानने त्यानुसार आश्वासक सुरुवात केली होती

मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी

चमकदार कामगिरी करत पाकिस्तानचा

6 धावांनी पराभव केला.

पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 113 धावाच करता आल्या.

टीम इंडियाचा हा या वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला आहे.

Also Read: https://ajinkyabharat.com/hardik-and-natasha-mulga-krunal-pandyas-house-shift-half-photo-and-video-discussion/

Related News