Delhi Red Fort Blast Video : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातील कार स्फोटाचा हादरवून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. यूट्यूबरच्या कॅमेऱ्यात संपूर्ण प्रसंग लाईव्ह कैद झाला असून स्फोटानंतर लोक सैरावैरा पळताना दिसत आहेत.
दिल्लीतील भीषण कार स्फोटाने देश हादरला
दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण कार स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. या स्फोटात तब्बल 9 जणांचा मृत्यू झाला असून 30 पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. स्फोट आय-20 कारमध्ये झाला असून डॉ. उमर नावाच्या व्यक्तीचे नाव या प्रकरणात पुढे आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा आत्मघातकी हल्ला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Delhi Red Fort Blast Video सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, या भीषण स्फोटाचा एक हादरवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या Delhi Red Fort Blast Video मध्ये एक यूट्यूबर मुलाखत घेत असतानाच स्फोट झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. अचानक झालेल्या या स्फोटामुळे आजूबाजूचे लोक घाबरले असून, सगळीकडे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.काही सेकंदांतच लोक सैरावैरा पळताना दिसत आहेत, आणि पार्श्वभूमीत जोराचा आवाज येताना ऐकू येतो. या व्हिडीओमुळे अनेकांनी सुरक्षेच्या त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Related News
दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर हत्या; शेतात फेकला मृतदेह, 50 CCTV फुटेज तपासून पोलिसांनी आरोपींना पकडले
Delhi Crime News
Continue reading
सीजेपीच्या आंदोलक विद्यार्थ्याला 5 लाखांची नोटीस; सरन्यायाधीश सूर्यकांत संतप्त
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही विद्यार्थ्यावर कारवाईचा प्रयत्न? मॅजिस्ट्रेटला उत्तर देण्याचे आदे...
Continue reading
मोदी मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता; महाराष्ट्रातून मंत्र्यांची संख्या कमी होणार का? कोण IN, कोण OUT?
मागील अनेक दिवसांपासून केंद्रातील नरे...
Continue reading
अभिजीत दीपके यांच्या ५ सप्टेंबरच्या दिल्ली आंदोलनाला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील; सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, “अप्रिय घटना होईल असे ठोस कारण नाही”
Continue reading
1 लाख रुपयांचे कॅन्सरचे इंजेक्शन निघाले चक्क पाणी! काळ्या बाजाराचा धक्कादायक पर्दाफाश
कर्करोगासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या जीवाशी खेळ...
Continue reading
पॅलेट गन पीडितासह राहुल गांधी यांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; पोलिसांवर गंभीर आरोप काय?
जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान पॅलेट गनचा वापर झाल्याच्या आरोपावरून...
Continue reading
“लेक्चर नको, आधी राजीनामा द्या!” राहुल गांधींचा अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल; जंतरमंतर गोळीबारावर थेट सवालनवी दिल्ली : जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्ज आणि प...
Continue reading
शिवसेना कोणाची? कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला थेट सवाल; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत शिंदे गटाविरोधात जोरदार युक्तिवाद
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना नाव आणि चिन्हावरील वादाची ...
Continue reading
शिवसेना कोणाची? कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला थेट सवाल; एकनाथ शिंदे गटाच्या अडचणी वाढणार?
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर सुनावणी; ठाकरे गटाकडून जोरदार ...
Continue reading
FCRA विधेयकावरून भारत-अमेरिका संबंधांमध्ये नव्या वादाची चिन्हे; अमेरिकन खासदारांचा विरोध, केंद्र सरकार मात्र ठाम
संसदेत येणाऱ्या FCRA विधेयकावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
विदे...
Continue reading

Delhi Red Fort Blast Video नंतर पोलिसांची धावपळ
या स्फोटानंतर दिल्ली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. स्फोट झालेली कार तीन ते चार तास एका ठिकाणी उभी होती, असे सूत्रांनी सांगितले आहे. त्यानंतर ती सिग्नलजवळ पोहोचताच स्फोट झाला.
तपास यंत्रणा सध्या कारचा तांत्रिक तपास, CCTV फुटेज, आणि डॉ. उमरच्या कुटुंबीयांची चौकशी करत आहे. पोलिसांचा भर या कारची मुव्हमेंट ट्रेस करण्यावर आहे.
Delhi Red Fort Blast Video नंतर देशभरात भीतीचे वातावरण
या घटनेनंतर दिल्लीसह संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षा यंत्रणांना हायअलर्टवर ठेवण्यात आले आहे. स्फोटाचा हा व्हिडीओ नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून, लोक सोशल मीडियावर आपला संताप आणि शोक व्यक्त करत आहेत.
या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा दिल्लीच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला असून, तपास यंत्रणांकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे.
read also : https://ajinkyabharat.com/delhi-blast-2025-lady-commander-dr-shaheena-shahid-jaish-e-mohammedachi-india-lady-commander-tharli-blastachi-mastermind/