शेतकरी बांधवांसाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे कडून आवाहन…

अकोला

शेतकरी बांधवांनो सध्या बाजारात बीटी कपाशीच्या एका विशिष्ट बियाण्याची मागणी

व पुरवठ्यातील तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कृषी केंद्राकडे मोठी गर्दी होत आहे

Related News

.तसेच अकोला जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रधारक यांच्याकडे त्या विशिष्ट वाणांच्या

बियाण्याचा साठा संपला असल्याचे लेखी पत्र जिल्हा कृषी व्यावसायिक संघाकडून जिल्हा

अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला यांना प्राप्त झाले आहे .

शेतकरी बांधवांनी कपाशीच्या एकाच विशिष्ट वाणाचा आग्रह न धरता बाजारात उपलब्ध

असणाऱ्या समतुल्य वाणांची निवड करावी. सध्या बाजारात इतर कंपन्यांचे

लवकर येणारे, मोठ्या बोंडाचे व अधिक उत्पन्न देणारे बरेच वाण विक्री करिता उपलब्ध आहेत.

म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला यांच्याकडून

कापूस उत्पादक शेतकऱरी बांधवाना आवाहन करण्यात येते की

अपेक्षित असलेले एका कंपनीचे विशिष्ट वाणाचा आग्रह न धरता इतर

समतुल्य असणाऱ्या पर्यायी वाणांची निवड करावी व

यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करावा.

Related News