जान्हवी कपूरने याचबरोबर अनेक गोष्टींचा खुलासा केला आहेय
जान्हवी कपूरचं हे विधान चर्चेत आहे.
Related News
Year Ender 2025: पिक्चरपेक्षा वादाचीच चर्चा, 2025 मध्ये या चित्रपटांवरून झाला गदारोळ
2025 – बॉलीवूडसाठी एक गजबजलेले वर्ष
साल 2025 हे वर्ष बॉलीवूडसाठी नक...
Continue reading
Mumbai : वरळी सी फेसवर डॉल्फिन्सचं दर्शन, मुंबईकरांची उत्स्फूर्त गर्दी
Mumbai म्हणजे सतत धावपळ, लोकलची गर्दी, वेळेच्या मागे धावणारी माणसं आणि कधीही न ...
Continue reading
Mumbaiत दादरमध्ये तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा, अग्निशमन दलाने वाचवले
Mumbai तील दादर रेल्वे स्थानक परिसरात शुक्रवारी पहाटे एका तरुणाने केलेल्या कृत्यान...
Continue reading
लिओनेल मेस्सीचा भारत दौरा आणि वानखेडे स्टेडियममधील जंगी स्वागत
फुटबॉलच्या दुनियेत लिओनेल मेस्सीचं नाव एखाद्या देवासमान आहे. अर्जेंटिनाला आपल्या ...
Continue reading
मुंबई अंडरवर्ल्डच्या इतिहासात अनेक नावे आहेत, परंतु ७०-८० च्या दशकात जे नाव सगळ्यात जास्त आदर आणि भीतीने घेतले जात असे, ते म्हणजे हाजी मस्तान मि...
Continue reading
अक्षय खन्ना व त्याच्या वडिलांच्या खळबळजनक वक्तव्याचा इतिहास
Continue reading
अभिनेता अक्षय खन्ना आपल्या अभिनय कौशल्यामुळे आणि स्टायलिश व्यक्तिमत्वामुळे नेहमीच चाहत्यांच्या लक्षात येतात. ‘छावा’ नंतर त्याला पुन्हा एक जोरदार कमबॅक मिळालेला आहे, आणि त्याचे हे प...
Continue reading
धुरंधर चित्रपटावर अक्षय खन्नाची कमाल एण्ट्री; एक्स-गर्लफ्रेंड तारा शर्माची खास पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
अक्षय खन्ना सध्या थिएटरपासून ते सोशल मीडियापर...
Continue reading
5201314 : 2025 मध्ये भारतीय इंटरनेट वापरकर्त्यांच्या सर्चिंग पॅटर्नवर नजर टाकली असता, एक अत्यंत अनोखा ट्रेंड दिसून आला. Google च्या 'Year in Search' लिस्टमध्ये अनेक पारंपरिक शब्द, ...
Continue reading
प्राजक्ता माळी फॅन पेजवरील एआय फोटो पाहून चिडली; चाहत्यांना केली विनंती
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे लाखो चा...
Continue reading
‘Rupal Tyagi Marriage’ 2025 मध्ये झाली आणि तिचे आनंददायक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाहा रुपल त्यागीच्या लग्नाचे खास क्षण आणि ...
Continue reading
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेस माही’च्या प्रमोशन्समध्ये व्यग्र आहे.
लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात जान्हवीबरोबर राजकुमार राव प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
जान्हवी कपूर शिखर पहारियाबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याने तिच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
त्यामुळे अनेकदा तिच्या लग्नाबाबत अफवादेखील पसरल्या आहेत.
जान्हवीने नुकतीच टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली.
या मुलाखतीत जान्हवीने तिच्या आणि शिखरच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे आणि लग्नाच्या अफवांबद्दल मौन सोडलं आहे.
जान्हवी कपूर म्हणाली,
“मी नुकतंच कुठेतरी वाचलं की काही जण म्हणतायत की मी कोणत्या तरी रिलेशनशिपची पुष्टी दिली आहे
आणि आता माझं लग्न होणार आहे. लोकं दोन-तीन आर्टिकल मिक्स करतात आणि मी लग्न करणार आहे
हे जाहीर करून टाकतात. ते माझं लग्न याच आठवड्यात लावतायत आणि या सगळ्याला माझी परवानगी नाही”
, असं मजेशीररित्या जान्हवी म्हणाली. “मला सध्या फक्त कामाकडे लक्ष केंद्रित करायचंय”, असंही जान्हवी म्हणाली.
या अफवांबाबत बोलण्याची जान्हवीची ही काही पहिलीच वेळ नाही.
या महिन्याच्या सुरुवातीला इन्स्टाग्रामच्या एका पापाराझी पेजवर अफवा पसरली होती की,
जान्हवी सोनेरी रंगाची साडी नेसून तिरुपती मंदिरात शिखरबरोबर लग्न करणार आहे.
या अफवेवर जान्हवीने मजेशीर उत्तर दिलं. जान्हवी म्हणाली, “म्हणजे लोकांचं आपलं काहीही सुरू असतं.”
जान्हवीने काही महिन्यांपूर्वी ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या पर्वात बहीण खुशीबरोबर हजेरी लावली होती.
या शोमध्ये तिने वैयक्तिक आयुष्याबद्दलही खुलासा केला होता.
या दरम्यान जान्हवीने शिखर पहारियाबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुलीही दिली होती.
दरम्यान, जान्हवीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, जान्हवीचा ‘मिस्टर अँड मिसेस माही’ ३१ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
तर अभिनेत्री ‘देवरा: भाग १’ या चित्रपटातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.
जान्हवीने ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगलादेखील सुरुवात केली आहे.
Read Also
https://ajinkyabharat.com/mera-sami-song-release-from-pushpa-2-srivalli-aani-pushpachaya-couple-songcha-kalla/