The terrifying face of a prestigious school in Jaipur : ९ वर्षांच्या विद्यार्थिनीचा मृत्यूने उघड केला सत्य!

Jaipur

Jaipur Tragedy : “मला शाळेत जायचं नाही…” — ९ वर्षांच्या मुलीने शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली; पालकांचा गंभीर आरोप — “बुलिंग, छेडछाड, आणि शाळेचा निष्काळजीपणा”

Jaipur : Jaipurच्या प्रतिष्ठित नीरजा मोदी स्कूल मध्ये घडलेली हृदयद्रावक घटना सध्या संपूर्ण राजस्थानसह देशभरात संताप निर्माण करत आहे. अवघ्या नऊ वर्षांच्या अमैरा मीणा हिने शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने केवळ पालक नव्हे, तर शिक्षणव्यवस्थेतील त्रुटींवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

“मला शाळेत जायचं नाही… मला पाठवू नका…”

एक वर्षांपूर्वी अमैराची आई शिवानी मीणा यांनी आपल्या मुलीचा व्हॉट्सअप व्हॉइस रेकॉर्डिंग तयार केला होता. त्या रेकॉर्डिंगमध्ये अमैरा रडत रडत म्हणते, “मला शाळेत जायचं नाही… मला पाठवू नका.
आईने हे ऑडिओ रेकॉर्डिंग थेट क्लास टीचरला पाठवले, तिच्या मुलीच्या मनात काहीतरी भीती, असुरक्षितता किंवा त्रास आहे हे दाखवण्यासाठी. पण शिक्षकांनी ते दुर्लक्ष केल्याचा पालकांचा आरोप आहे.

शिवानी मीणा सांगतात, “मी वर्गशिक्षिका, क्लास कोऑर्डिनेटर यांच्याशी अनेकदा बोलले. पण त्यांनी माझ्या तक्रारींना फारसं गांभीर्याने घेतलं नाही. ‘लहान मुलं असतात, भांडतात, पुन्हा मिळतात,’ असं म्हणून सगळं दुर्लक्ष केलं.”

Related News

चौथ्या मजल्यावरून उडी

१ नोव्हेंबर रोजी ही Jaipur दुर्दैवी घटना घडली. चौथ्या वर्गात शिकणारी अमैरा नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. सकाळच्या सत्रात ती दोनदा आपल्या शिक्षिकेकडे गेली, हे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झालं आहे. पण काही मिनिटांनी तिने शाळेच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी घेतली.
ती जागीच ठार झाली.

या घटनेनंतर संपूर्ण शाळेत आणि शहरात खळबळ माजली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले, परंतु महत्त्वाची बाब म्हणजे — फुटेजमध्ये आवाज नाही. सीबीएसईच्या नियमांनुसार शाळेतील सीसीटीव्हीमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग असणे अनिवार्य आहे. परंतु येथे तसे नव्हते. त्यामुळे अमैराने शिक्षकांशी काय बोलले, ती का व्यथित होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

“शाळेने तक्रारींकडे दुर्लक्ष केले”

वडील विजय मीणा यांनी सांगितले, “पालक-शिक्षक बैठकीत काही विद्यार्थ्यांनी अमैराकडे बोट दाखवत कुजबुज केली होती. ती घाबरून माझ्या मागे लपली. मी शिक्षकांना विचारलं तर त्यांनी उत्तर दिलं की, ‘ही को-एड शाळा आहे, मुलींनी मुलांशी बोलायला शिकायला हवं.’ मी सांगितलं — ती माझ्या मुलीची वैयक्तिक निवड आहे. पण शाळेने त्याकडे दुर्लक्षच केलं.” पालकांचा आरोप आहे की गेल्या वर्षभरात अमैरावर बुलिंग, टॉम-बॉय चिडवणूक, आणि अश्लील स्वरातील शब्दांचा वापर करण्यात आला. हे सर्व तक्रारी शिक्षक आणि कोऑर्डिनेटरकडे पोहोचवूनही शाळेने कोणतीच ठोस कारवाई केली नाही.

“सुरक्षेची जबाबदारी कोणी घेतली?”

अमैरा हिचे काका साहिल मीणा यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी सांगितले,

“शाळेत ५,००० पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत, सहा मजल्यांची इमारत आहे. अतिरिक्त मजले बांधण्यासाठी शाळेला परवानगी कोणी दिली? आणि जर दिली, तर तिथे सुरक्षेसाठी जाळी किंवा ग्रिल का नाही? अशा उघड्या गॅलऱ्यांतून मुलं कशी सुरक्षित राहतील? हे सर्वात मूलभूत सुरक्षेचे नियम आहेत.
शिवाय, सीसीटीव्हीमध्ये आवाज का नाही? सीबीएसईच्या नियमांनुसार १५ दिवसांची ऑडिओ-व्हिडिओ फुटेज जपली पाहिजे. पण इथे तीही नाही. ही जयपूरमधील सर्वात प्रतिष्ठित शाळा आहे, प्रचंड फी घेतात, मग जबाबदारी कुठे आहे?”

पोलिस आणि शिक्षण विभागाचा तपास

Jaipurचे उपपोलीस आयुक्त (DCP) राजर्षी राज वर्मा यांनी सांगितले की, “आम्ही पालकांचे निवेदन घेतले आहे आणि सर्व बाबींची तपासणी सुरू आहे. पालक धक्क्यात होते, पण आता आम्ही त्यांच्या सर्व शंका अधिकृतरीत्या नोंदवत आहोत. सखोल चौकशी होईल.” त रJaipur जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) रामनिवास शर्मा यांनीही सांगितले की, पुढील दोन ते तीन दिवसांत पोलीसांच्या उपस्थितीत पालकांचे अधिकृत निवेदन घेतले जाईल.

शर्मा म्हणाले, “काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की, त्या दिवशी अमैरा शाळेत यायची इच्छा व्यक्त करत नव्हती. काही मुलांनी ‘वाईट शब्द’ वापरल्याचीही चर्चा आहे, पण ती अधिकृतरीत्या माझ्या निदर्शनास आलेली नाही.”

शाळेचा मौनव्रत — उत्तराची प्रतीक्षा

घटनेनंतरही नीरजा मोदी स्कूल प्रशासनाने कोणताही अधिकृत प्रतिसाद दिलेला नाही. शाळेच्या प्राचार्यांकडून किंवा व्यवस्थापनाकडून कोणतेही निवेदन प्रसारमाध्यमांना देण्यात आलेले नाही. स्थानिक सामाजिक संघटना आणि पालक संघटनांनी या प्रकरणाची CBSE आणि राज्य शिक्षण मंत्रालयाकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

देशभरात संताप

या घटनेनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. #JusticeForAmaiyra हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे. अनेकांनी शाळेतील बुलिंग आणि मानसिक त्रासामुळे मुलांवर होणाऱ्या परिणामांबद्दल जनजागृतीची मागणी केली आहे. बाल मानसशास्त्रज्ञांच्या मते, “अशा घटना मुलांच्या मानसिक आरोग्य व्यवस्थेतली मोठी उणीव दाखवतात. शाळांनी फक्त गुणांवर नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या भावनिक स्थितीवर लक्ष देणे आवश्यक आहे.”

प्रश्न अनुत्तरितच…

अमैरा गेल्यानंतर तिच्या घरात आजही तिच्या आवाजाचे प्रतिध्वनी आहेत —
मला शाळेत जायचं नाही… मला पाठवू नका…

त्या रेकॉर्डिंगमधला आवाज आज संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला प्रश्न विचारतोय —
मुलांच्या सुरक्षेचं, आत्मसन्मानाचं आणि मानसिक आरोग्याचं रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची?

 अमैरा मीणा (वय ९) — Jaipurच्या नीरजा मोदी स्कूलची विद्यार्थीनी. १ नोव्हेंबर २०२५ रोजी चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू. प्रकरणाची चौकशी सुरू.

read also : https://ajinkyabharat.com/inauguration-of-4-vande-bharat-express-trains-across-the-country-new-chapter-of-speed-and-pride/

Related News