दीपिका पदुकोणचा हा ड्रेस गौरी आणि नैनिका या डिझायनर्सनी डिझाइन केला होता.
दीपिका पादुकोणचा हा पिवळ्या रंगाचा ड्रेस विकला गेला आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)
Related News
अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच आई होणार आहे. गरोदर दीपिका नुकतीच एका कार्यक्रमासाठी पिवळ्या रंगाचा सुंदर ड्रेस घालून गेली होती. या ड्रेसची विक्री करण्यात आली
आहे. दीपिकाचा हा ड्रेस हजारो रुपयांना विकला गेला आहे, अभिनेत्रीने यासंदर्भात तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केली आहे.
नुकताच दीपिका पादुकोणने आउटिंगसाठी घातलेला पिवळा लाँग गाऊन ड्रेस तुम्हाला आठवत असेल.
दीपिकाने या ड्रेसमध्ये खूप सुंदर फोटोशूट केलं होतं. तिने हा ड्रेस घालून एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
तिचा हा ड्रेस गौरी आणि नैनिका या डिझायनर्सनी डिझाइन केला होता. हा ड्रेस लिलावासाठी ठेवण्यात आला होता.
हा ड्रेस विकल्यानंतर आलेले पैसे चांगल्या कामासाठी दान करण्यात करण्यात आले आहेत.
दीपिका पादुकोणचा पिवळा ड्रेस ३४ हजार रुपयांना विकला गेला. ही रक्कम अभिनेत्रीच्या लिव्ह लव्ह लाफ
फाऊंडेशनला मदतीसाठी देण्यात आली आहे. दीपिकाने या ड्रेसमधील तिचा एक छानसा व्हिडीओ शेअर केला होता,
पण या ड्रेसची किंमत व्हिडीओत देण्यात आली नव्हती. आता तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर या ड्रेसमधील एक फोटो शेअर केला आहे,
ज्यावर ‘सोल्ड आउट’ असं लिहिलं आहे.
मतदानाच्या दिवशी दिसला दीपिकाचा बेबी बंप
दीपिका पदुकोण त्यापूर्वी मतदानासाठी घराबाहेर पडल्यावर पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली होती. २० मे रोजी मुंबईत लोकसभा निवडणुकांसाठी मतदाना पार पडलं.
त्यादिवशी रणवीर व दीपिका दोघे कारने मतदान केंद्रावर पोहोचले होते. त्यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
रणवीर व दीपिका पांढरे शर्ट व डेनिम पँट अशा लूकमध्ये मतदानासाठी आले होते. यावेळी दोघांना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
या गर्दीतून वाट काढत रणवीरने गरोदर दीपिकाला कारपर्यंत पोहोचवलं होतं.
दीपिका- रणवीर सप्टेंबर महिन्यात करतील बाळाचं स्वागत
दरम्यान, रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांनी २९ फेब्रुवारी २०२३ रोजी ते आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली होती.
दीपिकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने ‘सप्टेंबर २०२४’ असं लिहिलं होतं. पोस्टमध्ये तिची व रणवीरची नावं होतं
. या पोस्टमध्ये लहान बाळाचे कपडे व खेळण्यांचे चित्र होते. रणवीर व दीपिका दोघेही लग्नानंतर सहा वर्षांनी आई-बाबा होणार आहेत.
दोघेही सप्टेंबर २०२४ मध्ये पहिल्या बाळाचं स्वागत करतील ..