अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सापळा रचून लाच घेताना एका लिपिक कर्मचाऱ्यास अटक

अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सापळा रचून लाच घेताना एका लिपिक कर्मचाऱ्यास ताब्यात घेतले या घटनेमुळे संपूर्ण शहरासह पोलीस वर्तुळात खळबळ उडाली . प्राप्त माहितीनुसार अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिक कर्मचाऱ्याने एका कर्मचाऱ्यांच्या टी ए डी ए बिल मंजुरीसाठी वीस हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. सदर कर्मचाऱ्यांनी या संदर्भात अमरावती अँटीकरप्शन ब्युरो कडे तक्रार केल्यामुळे या तक्रारीची शहानिशा करून अमरावती अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सापळा रचला यादरम्यान संबंधित कर्मचाऱ्याला वीस हजार रुपयांपैकी आठ हजार रुपये नगदी घेताना अँटी करप्शन ब्युरो अमरावती यांनी ताब्यात घेते या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ मिळाली असून पोलीस वर्तुळात सुद्धा खळबळ उडाली आहे. अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अशी घटना घडली यावरून चर्चेला उधाण आले आहे.

read also :https://ajinkyabharat.com/major-action-taken-against-1xbet-scam-suresh-raina-and-shikhar-dhawans-assets-worth-rs-11-14-crore-seized/

Related News