अकोट शहरात श्री नरसिंग महाराज यात्रा महोत्सव
अकोट : शहरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा श्री नरसिंग महाराज यात्रा महोत्सव दिनांक ०६/११/२०२५ वार गुरुवार ते १५/१२/२०२५ वार सोमवार पर्यंत श्री नरसिंग महाराज यात्रा प्रारंभ होणार आहे. यात्रेमध्ये नरसिंग महाराज मंदिर संस्थानच्या वतीने मंदिरात दररोज भजन,प्रवचन, हरिपाठ, भारुड,नाम संकीर्तन ई. कार्यक्रम आयोजित केले आहे. या कार्यक्रमास परिसरातील भक्तांनी उपस्थित राहून श्री दर्शनाचा व प्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.दिनांक ०६/११/२०२५ कार्तिक वद्य !! १!! श्री तीर्थ स्थापना सकाळी ९ वाजता.दिनांक ०७/११/२०२५ कार्तिक वद्य !! ३ !! श्री संत मियासाहेब यांची तक्त स्थापना सकाळी ९ वाजता. तसेच कार्तिक मास काकडा आरती समाप्ती.दिनांक ०८/११/२०२५ कार्तिक वद्य !! ४ !! श्री नरसिंग महाराज यांची पालखी श्री गुरुपुजे (संदल) करिता गुरुस्थानी उमरा ता. आकोट (आकोट पासून ९ किलो मीटर अंतर) येथे ह भ प अनंतराव देशमुख (कुटासा) यांचे प्रमुख सहभागात दुपारी १२ वाजता निघेल तसेच श्री गुरुपूजे नंतर संध्याकाळी ६ वाजता अग्रसेन चौक, पोपटखेड रोड येथून श्री पालखी मिरवणूक श्री नरसिंग मंदिरात परत येईल.दिनांक ०९/११/२०२५ कार्तिक वद्य !! ५ !! श्री नरसिंग महाराज यांची यात्रा (विविध धार्मिक कार्यक्रम)दिनांक १०/११/२०२५ कार्तिक वद्य !! ६ !! श्री नरसिंग महाराज यांची पालखी सकाळी ०९ वाजता ह भ.प. अनंतराव देशमुख (कुटासा) यांचे प्रमुख सहभागात श्री नरसिंग मंदिरातून निघेल.व दुपारी ४ वाजता श्री पालखी मिरवणूक श्री मंदिरात परत येईल व नंतर गोपाळकाला (दहीहांडी) तसेच महाप्रसाद.दिनांक १३/११/२०२५ कार्तिक वद्य !! ८ !! श्री हरीनाम सप्ताहाची समाप्ती सकाळी ०९ वाजता ह.भ.प. प्रभाकर बुवा सरोदे (आकोट) यांचे काल्याचे कीर्तन सकाळी ११ वाजता.दिनांक १६/११/२०२५ कार्तिक वद्य !! १२ !! श्री नरसिंग महाराजांचे समाधीस सकाळी ६ वाजता रुद्राभिषेक व सकाळी ९ वाजता श्री गाईची पूजा (गोतांबील)दिनांक १७/११/२०२५ कार्तिक वद्य !! १३ !! श्री संत मियासाहेब यांचे तक्ता समोर काकडा आरती, भजन, गोपाळकाला प्रक्षाळ पूजेचे भजन, रात्री ०८ ते १० पर्यंत.श्री नरसिंग महाराज यात्रा महोत्सव कार्तिक वद्य !! ५ !! झाल्यानंतर पुढील ५ बुधवार व रविवार पावेतो सुरु राहील.
read also : https://ajinkyabharat.com/meaning-of-stickers-on-fruits-90/
