गोमांस वाहतूक करणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात , 44 हजारांचा मुद्देमाल जप्त

गोमांस

अकोट ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई: गोमांस वाहतूक करणारा तरुण पकडला, ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त

अकोट – अकोट ग्रामीण पोलिसांनी गोमांस वाहतूक करताना एक तरुण पकडला आहे. पोलिसांचे पथक नियमित गस्त दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे मोहाळा ते आंबोडा रोडवरील कृष्णाई गौरक्षण संस्थेजवळ नाकाबंदी केली.

Related News

सदर कारवाईत शेख अदनान शेख अन्सार (वय १९, रा. अकोलखेड) याला ७० किलो गोमांस आणि मोटारसायकलसह पकडण्यात आले. गोमांसची किंमत सुमारे १४ हजार रुपये तर मोटारसायकलची किंमत ३० हजार रुपये असून, एकूण ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, ही कारवाई अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार अमोल माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉ. विठ्ठल चव्हाण, पोकॉ. गोपाल जाधव आणि नितीन तेलगोटे यांनी केली आहे.

read also : https://ajinkyabharat.com/sampada-munde-episode/

Related News