कुख्यात गुन्हेगार मिथुन उर्फ मॉन्टी” 1 देशी कट्टा व तलवारसह अटक!

अटक

स्थानीक गुन्हे शाखेची अचूक कारवाई

अकोला – पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार शहरातील अवैध धंदे व गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी एका कुख्यात गुन्हेगाराला देशी कट्टा, जिवंत काडतूस व तलवारसह अटक केली आहे.गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. विजय चव्हाण, पो.उप.नि माजीद पठाण, विष्णु बोडखे यांनी पथकासह चिवचिव बाजार परिसरात छापा टाकला.या कारवाईत आरोपी मिथुन उर्फ मॉन्टी सुधाकर इंगळे (४५) रा. चिवचिव बाजार, अकोला) याच्या घरातून लोखंडी धातूचा देशी कट्टा (अग्निशस्त्र), एक जिवंत काडतूस, लोखंडी तलवार व लोखंडी कत्ता असा एकूण ३१ हजार ३०० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने हे शस्त्र विनापरवाना जवळ बाळगत असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी आरोपीवर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. शंकर शेळके, स.पो.नि विजय चव्हाण, पोउपनि माजीद पठाण, विष्णु बोडखे, तसेच पो.हे.कॉ शेख हसन, रविंद्र खंडारे, अब्दुल माजीद, महेंद्र मलिये, किशोर सोनुने, एजाज अहमद, वसीमोददीन, भास्कर धोत्रे, पोकॉ अशोक सोनुने, श्रीकांत पातोंड, पोहवा प्रशांत कमलाकर यांच्या संयुक्त पथकाने केली.
या यशस्वी कारवाईनंतर अकोला पोलीस दलाने पुन्हा एकदा शहरातील गुन्हेगारीवर कडक अंकुश आणल्याचे दाखवून दिले आहे.

read also :https://ajinkyabharat.com/u200bkhaparkhed-fatyawar-car-and-autos-horrific-accident-1-prawashacha-jagich-dead/

Related News

Related News