महाराष्ट्र धोबी परीट समाज आरक्षण समन्वय समितीकडून अकोला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

महाराष्ट्र धोबी परीट समाज आरक्षण समन्वय समिती द्वारा आज अकोला येथे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले .धोबी समाज 1960 पूर्वी भंडारा व बुलढाणा जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या शासकीय आदेशामध्ये आहे हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे .परंतु 1960 ला महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि हे दोन्ही जिल्हे ओबीसी मध्ये टाकण्यात आले. त्यामुळे हे दोन जिल्हे पूर्वरत अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करून अनुसूचित जाती जमाती कायदा अनुसार अंमलबजावणी करून आमच्या समाजाला न्याय द्यावा. डॉ.भांडे समितीच्या शिफारशी राज्य शासनाने तात्काळ लागू कराव्यात यासाठी आज महाराष्ट्रभर निवेदने देण्यात आले. एकाच देशात धोबी समाजाचे दोन प्रवर्गामध्ये विभाजन झाले आहे. या चुकीमुळे अनेक वर्षापासून सामाजिक आर्थिक क्षेत्रात पीडित असलेल्या समाज शैक्षणिक क्षेत्रातही पीडितच आहे . अशा प्रांत रचनेपूर्वी विदर्भ वराळ हा मध्य प्रदेश मध्ये होता या जिल्ह्यात राहणारा धोबी समाज अनुसूचित जाती होता .परंतु एक मे 1960 ला महाराष्ट्र निर्मिती झाली आणि पाच जिल्ह्यातील तीन जिल्हे मध्य प्रदेशात आणि दोन जिल्हे भंडारा बुलढाणा महाराष्ट्रात जोडले गेले या दोन्ही जिल्ह्यात मिळणाऱ्या अनुसूचित जातीच्या सवलती बंद करून त्यांना ओबीसी प्रवर्गामध्ये टाकण्याचे काम सरकारने केले . कोणत्याही जातीचा राज्यातील भूभाग बदलल्यामुळे त्या त्या जातीचा सामाजिक दर्जा बदलत नसतो भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यातील धोबी समाज महाराष्ट्र निर्मितीपूर्वी अनुसूचित जातीत होता हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. अकोला जिल्ह्याच्या वतीनेही आज मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन देतांना समाज बांधव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
