अकोला: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील निवासस्थानी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की, “ओला दुष्काळ जाहीर न झाल्याशिवाय शासन कोणत्याही उपाययोजनेला परवानगी देऊ शकत नाही. पूर परिस्थिती ओसरल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही, मुख्यमंत्री ओला दुष्काळ जाहीर करण्यास का वेळ घेतात?” आंबेडकर यांनी शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार यावरही प्रश्न उपस्थित केला. तसेच सातबारा कोरा करण्याच्या राजकीय मागणीवर सर्व पक्षांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप सोडून अन्य पक्षांच्या युतीला मंजुरी देण्यास ते तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, कौटुंबिक चर्चांबाबत माहिती देण्यास त्यांनी नकार दिला, मात्र आंबेडकर बंधू एकत्र येण्यास कोणतीही अडचण नसल्याचेही सांगितले.
read also:https://ajinkyabharat.com/gaurakshana-aani-cleanliness-campaign-activated-participation/
