मराठी तरुणांनी उत्तमोत्तम शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता उद्योग क्षेत्राकडे वळावे, असे प्रतिपादन आमदार अमोल मिटकरी यांनी केले. हे त्यांनी महाराष्ट्र कुंभार समाज विकास परिषद, अकोला द्वारे आयोजित कुंभार समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव आणि स्वागत सत्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण साविकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार अमोल मिटकरी, उद्योजक किशोर कापडे, तुळशीदास तळोकार, वसंतराव घाटोळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते विठ्ठल भक्त संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांना शाल व श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. सन २०२५ मध्ये दहावी-बारावी व पदवी प्राप्त तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५६ विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह व गुलाबपुष्य देऊन गौरव करण्यात आला. इयत्ता १० वी मध्ये कू. वैष्णवी घाटोळे हिने ९९.८० गुणप्राप्त केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव केला गेला.कार्यक्रमाला विविध ठिकाणाहून कुंभार समाज बांधव तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक: सचिव राम मेहरे
संचालन: शिक्षक रामदास गाडेकर
आभार प्रदर्शन: प्राध्यापक दिलीप अप्तुरकार
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील साविकर, योगेश इंगळे, विजय मेहरे, राजेश साविकर, संजय वाडकर, सुरेश मेहेरे, रामदास सरोदे, भास्कर गंद्रे, दुर्गेश चोंडके, यश साविकर, मंदार मेहेरे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.
read also:https://ajinkyabharat.com/dharashiv-jilam-shetkyanasathi-dilsa/