कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील भादोले गावात निर्घृण हत्याकांड उघडकीस आले आहे. पतीने पत्नीची हत्या केली आणि गावात जाऊन कबुली दिल्यानंतर तो फरार झाला. या हत्येने कोल्हापूर शहरात भीतीचे सावट पसरले आहे. माहितीनुसार, सोमवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास आरोपी प्रशांत पाटीलने त्याच्या पत्नी रोहिणी पाटीलच्या डोळ्यात चटणी टाकली आणि त्यानंतर तिच्या गळ्यावर कोयत्याने सपासप वार करून तिचा जीव घेतला. ही घटना भादोले-कोरेगाव रस्त्यावर घडली. घटनास्थळी पोहोचलेल्या वडगाव पोलिसांनी ताबडतोब तपास सुरू केला आणि आरोपी प्रशांतला रात्री उशिरा ताब्यात घेतले. आरोपीने घटनास्थळी येऊन गावकऱ्यांसमोर पत्नीचा खून कबूल केला आणि मुलींवर लक्ष ठेवण्याची सूचना दिली, त्यानंतर पळ काढला. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे, हा खून नेमका का झाला, त्यामागचे कारण काय आहे, याची चौकशी सुरू आहे. मृत महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
read also:https://ajinkyabharat.com/womens-holiness-and-public-awareness-program/
