आराध्याचं शहाणपणही दिसलं कौतुकास्पद

ऐश्वर्याच्या प्रेमळ कृतीने चाहत्याचे अश्रू थांबले

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तिने रडणाऱ्या चाहत्याला दिलेली प्रेमळ प्रतिक्रिया पाहून नेटकरी तिचं कौतुक करत आहेत. ऐश्वर्याचे सौंदर्य, अभिनय आणि चित्रपटांनी तिला चाहत्यांच्या मनावर राज्य मिळवून दिले आहे, पण तिच्या चाहत्यांबरोबर प्रेमळ आणि संवेदनशील वागण्यामुळे देखील ती नेहमीच चर्चेत राहते. व्हायरल व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन एका इमारतीतून बाहेर पडताना दिसतात. त्या वेळी एक रडणारी चाहती तिथे दिसते. सुरक्षा व्यवस्था बाजूला करून ऐश्वर्या लगेच त्या चाहतीकडे धावून गेली, तिला मिठी मारली, अश्रू पुसले आणि श्वास घेण्यास सांगितले. तिने चाहत्याचा हात धरला आणि फोटोसाठीही पोज दिला. नंतर ऐश्वर्या आणि आराध्या कारमध्ये बसल्या. यावर नेटकऱ्यांचे प्रतिक्रियाही प्रचंड आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले, “ती खूप गोड आहे,” तर दुसऱ्याने लिहिले, “क्वीन!” आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “ती ऐश्वर्या राय आहे, सगळ्यात सुंदर आणि प्रेमळ व्यक्ती.” काहींनी तर तिची तुलना जया बच्चनशी केली आणि ऐश्वर्याचे प्रेमळ वागणे विशेष नमूद केले. व्हिडिओमध्ये दिसले की आराध्या बच्चन प्रत्येक वेळेस कॅमेरापासून दूर राहण्याचा प्रयत्न करते. हॉटेलमध्ये जाताना लगेच आत गेली आणि चाहत्यांबरोबर फोटोसाठी थोडा वेळ थांबून लगेच कारमध्ये बसली. तिच्या समजदारपणामुळेही नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.

read also:https://ajinkyabharat.com/workplace-fame/