सन मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘कॉन्स्टेबल मंजू’ आता एका नवीन वळणावर आली आहे. मालिकेतील कॉन्स्टेबल मंजू आता इन्स्पेक्टर मंजू झाली आहे आणि तिचा नवा प्रवास आजपासून (29 सप्टेंबर) सुरू होत आहे. दररोज रात्री 8 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मंजूला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. आजोबा दत्ता कर्णे (वय 84)ही थेट सेटवर पोहोचले आणि मंजूला भेटले. प्रोमोमध्ये मंजू इन्स्पेक्टरच्या डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे, तर सत्याचा लूकही पूर्णपणे बदलला आहे. प्रेक्षक आता सत्या-मंजूच्या नात्यातील पुढील वळण पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मोनिका राठी, जिने मंजूची भूमिका साकारली आहे, म्हणाली: “मंजू या नावाने प्रेक्षकांनी दिलेली ओळख माझ्यासाठी आनंदाची आहे. कॉन्स्टेबलची जबाबदारी पार पडल्यानंतर आता इन्स्पेक्टर मंजूच्या रूपात नवा प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडत आहे. तिचा आत्मविश्वास, मेहनत आणि न्यायासाठीची लढाई आता अधिक जोमाने दिसेल. इन्स्पेक्टर मंजू म्हणून अधिक दमदार अॅक्शन आणि नवीन स्टंट्ससाठी मी पूर्णपणे तयार आहे.” मालिकेच्या या नव्या प्रवासामुळे प्रेक्षकांना मनोरंजनात भरभरून मजा मिळणार आहे आणि सत्या-मंजूच्या नात्यातील रहस्य आणि ट्विस्ट लवकरच उलगडणार आहेत.
read also:https://ajinkyabharat.com/rajya-paavasachaan-crisis/
