मुंबईत दसरा मेळाव्यामुळे रस्ते बंद! 2 ऑक्टोबरला प्रवासापूर्वी पर्यायी मार्ग तपासा” मुंबईकरांनो, 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमी अर्थात दसरा असल्याने शहरातील वाहतूक मोठ्या बदलांना सामोरे जाईल. शिवाजी पार्क आणि आझाद मैदान येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यामुळे काही मार्ग पूर्णपणे बंद राहतील तर काही ठिकाणी प्रवेशबंदी असेल. वाहतूक पोलिसांनी गर्दी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांची घोषणा केली आहे.
स्वातंत्रवीर सावरकर मार्ग (सिद्धी विनायक मंदीर जंक्शन ते एस बँक सिग्नल)
केळुस्कर रोड (दक्षिण) आणि केळुस्कर रोड (उत्तर), दादर
एम. बी. राऊत मार्ग (एस. व्ही. एस. रोड)
पांडुरंग नाईक मार्ग (एम. बी. राऊत रोड)
दादासाहेब रेगे मार्ग (सेनापती बापट पुतळा ते गडकरी चौक)
दिलीप गुप्ते मार्ग (शिवाजी पार्क गेट क्र. ५ ते शितलादेवी रोड)
एन. सी. केळकर मार्ग (हनुमान मंदिर ते गडकरी चौक)
एल. जे. रोड, राजा बडे जंक्शन ते गडकरी
पर्यायी मार्गांची माहिती: स्वातंत्रवीर सावरकर मार्ग – सिद्धी विनायक जंक्शन, एस. के. बोले रोड, आगार बाजार, पोर्तुगीज चर्च, गोखले रोड ,राजाबढे चौक जंक्शन ते केळुस्कर मार्ग – एल. जे. रोड, गोखले रोड-स्टिलमॅन जंक्शन,दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग – राजा बडे जंक्शन ते एल. जे. रोड ,गडकरी चौक ते केळुस्कर रोड – एम. बी. राऊत मार्ग प्रवाशांनी वेळेपूर्वी आपला मार्ग निश्चित करून प्रवास करावा.
read also:https://ajinkyabharat.com/konatya-divashi-banka-rahatil-closed/
