ओ ताई, दादा, काका.. ऑक्टोबरमध्ये बँका बंद! तुमच्या शहरातील सर्व सुट्ट्या एक क्लिकवर जाणून घ्या, गांधी जयंतीपासून दिवाळीपर्यंत ऑक्टोबर महिन्यात बँकांचे कामकाज 18 दिवस बंद राहणार, वेळापत्रक आणि ऑनलाईन सुविधा वाचा. ऑक्टोबर महिन्यापासून बँकांमध्ये सुट्ट्यांचा सण सुरू होतो. गांधी जयंती, दसरा, दुर्गा पूजा, लक्ष्मीपूजन, करवा चौथ, दिवाळी यांसारख्या सणांमुळे संपूर्ण देशात बँका बंद राहतील. यासोबतच प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तसेच सर्व रविवारी बँक कामकाज करणार नाहीत.
ऑक्टोबर महिन्यातील महत्वाच्या बँक सुट्ट्या:
1 ऑक्टोबर: केरळ, ओडिशा, त्रिपुरा, कर्नाटक, तामिळनाडू, नागालँड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, आसाम, झारखंड, मेघालय – महानवमी, दसरा, आयुधपूजा, दुर्गा पूजा (दसैन)
2 ऑक्टोबर: महात्मा गांधी जयंती, दसरा, दुर्गा पूजा (संपूर्ण भारत)
3-4 ऑक्टोबर: दुर्गा पूजा (सिक्कीम)
6 ऑक्टोबर: लक्ष्मीपूजन (त्रिपुरा, पश्चिम बंगाल)
7 ऑक्टोबर: महर्षी वाल्मिकी जयंती, कुमार पौर्णिमा (हिमाचल प्रदेश, ओडिशा, कर्नाटक, चंदीगड)
10 ऑक्टोबर: करवा चौथ (हिमाचल प्रदेश)
18 ऑक्टोबर: कटी बिहू (आसाम)
20 ऑक्टोबर: दिवाळी, नरक चतुर्दशी, कालीपूजा (देशभर, काही राज्य वगळून)
21-28 ऑक्टोबर: लक्ष्मीपूजन, गोवर्धन पूजा, भाऊबीज, छठ पूजा (राज्यनिहाय)
31 ऑक्टोबर: सरदार वल्लभभाई पटेल जयंती (गुजरात)
ऑनलाइन बँकिंग वापरून सुट्ट्यांमध्येही काम करा:मोबाईल बँकिंग अॅप्स, इंटरनेट बँकिंग, ATM, UPI द्वारे पैसे ट्रान्सफर, बिल पेमेंट, NEFT/RTGS/IMPS, डिजिटल केवायसी, नवीन खाते उघडणे, डेबिट/क्रेडिट कार्ड ब्लॉक करणे शक्य आहे.
सावधगिरी:ऑक्टोबरमध्ये बँक कामकाज बंद असल्यामुळे महत्त्वाच्या व्यवहारांसाठी आधी नियोजन करा.
read also:https://ajinkyabharat.com/suit-struggle/
