भारत-अमेरिका संबंधांवर ताण

डोनाल्ड ट्रम्पचा ‘डाव

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या नव्या निर्णयाने आणि वक्तव्याने भारताला मोठा धक्का बसला आहे. ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला असून, पाकिस्तानबद्दलच्या त्यांच्या जवळिकीच्या आणि कौतुकाच्या वक्तव्यांमुळे भारत-अमेरिका संबंधांवर ताण निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या नव्या व्यापार धोरणानुसार, भारतातून येणाऱ्या काही वस्तूंवर 50% पर्यंत टॅरिफ लावण्यात आले आहे. या निर्णयामुळे भारताच्या निर्यातीत मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबतचे संबंध अधिक दृढ करताना पाकिस्तानच्या नेतृत्वाचे खुलेआम कौतुक केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, “पाकिस्तान या प्रस्तावात माझ्यासोबत 100 टक्के उभा आहे. शहबाज शरीफ आणि असीम मुनीर हे अत्यंत खास नेते आहेत.” त्यांच्या या विधानानंतर भारताला मोठा धक्का बसला असून, भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. हमास आणि इस्त्रायलमधील युद्धात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न ट्रम्प करत आहेत. या युद्धाबाबत बोलताना त्यांनी पुन्हा पाकिस्तानचे कौतुक केले. “पाकिस्तानने या प्रस्तावाला 100 टक्के पाठिंबा दिला,” असे ट्रम्प यांनी सांगितले.  भारत आणि अमेरिकेतील दशकांपासूनचे संबंध व्यापार आणि संरक्षण क्षेत्रात मजबूत राहिले आहेत. परंतु, ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयामुळे आणि पाकिस्तानप्रेमी भूमिकेमुळे भारत चिंतेत आहे. तज्ज्ञांच्या मते, “ट्रम्प यांचा हा निर्णय अमेरिकेच्या व्यापार धोरणाला धक्का देणारा ठरेल आणि भारतासोबतचे संबंध बिघडवू शकतो.” या निर्णयानंतर चीन आणि भारतामधील जवळीकता वाढताना दिसते आहे. अमेरिका-पाकिस्तान जवळीकतेला उत्तर म्हणून भारत आणि चीन एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.

read also:https://ajinkyabharat.com/big-bosschi-chalakhis-cutumbic-decision/