198 शेतकऱ्यांचा जलसमाधी इशारा
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर गेल्या काही महिन्यांपासून संकटाचे सावट आहे. दि. 26 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का गावातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने या गावाचा समावेश आपत्तीग्रस्त क्षेत्रात जाहीर केला असला तरी आजतागायत शेतकऱ्यांच्या हाती एकाही रुपयाची मदत पोहोचलेली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
अतिवृष्टी, ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान
शेवटच्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी, ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आगामी हंगाम धोक्यात आला असून शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.अनेक शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभे आहेत.या गंभीर परिस्थितीवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करत, शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने 198 शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालय, सिंदखेड राजा येथे जोरदार इशारा देत निवेदन सादर केले.
जलसमाधी आंदोलनाची घोषणा
विशेष म्हणजे, प्रत्येक शेतकऱ्याने वैयक्तिक निवेदन दिले असून, समितीच्या वतीने एकत्रित निवेदनही सादर करण्यात आले आहे.निवेदनांमध्ये एकच मुद्दा ठरला आहे — 9 सप्टेंबर रोजी दुपारी 11 वाजता पळसखेड चक्का येथील पातळगंगा नदीवरील पुलाजवळ जलसमाधी आंदोलन करणे.सर्व शेतकऱ्यांचे वैयक्तिक निवेदन आणि संघटनेचे निवेदन एकत्रित रूपात एकच आंदोलन म्हणून साकारले जाणार आहे.शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री बालाजी जोशी म्हणाले –“शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आम्ही बलिदान द्यायलाही तयार आहोत. सरकारने त्वरित निर्णय घेऊन मदत करावी, अन्यथा शेतकरी आंदोलन उग्र होईल.”
Related News
राज्यात दुष्काळ जाहीर; 265 तालुक्यांचा समावेश, पंकजा मुंडे बांधावर पोहोचल्या; म्हणाल्या, ‘बळीराजाला बळी जाऊ देणार नाही’
राज्यात यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने अनेक भागांमध...
Continue reading
राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट; तिघांना क्लिनचिट, चार्जशीटमधून नेमकं काय समोर आलं?
उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात मोठी अपडेट समोर आल...
Continue reading
ज्ञानेश कुमार यांना भारतरत्न द्या; संजय राऊतांचा भाजपवर खोचक टोला
पश्चिम बंगाल निवडणुका आणि मतदार यादीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले; भाजपच्या पद्मभूषण मागणीवर राऊतांचा उप...
Continue reading
पेट्रोल पंपांवरील UPI पेमेंटचा ₹5 चार्ज हटणार? पेट्रोलियम मंत्रालयाचं मोठं स्पष्टीकरण; डीलर्सच्या मागणीवर काय म्हणाले?
पेट्रोल पंपावर इंधन भरल्यानंतर UPI द्वारे पेमेंट करणाऱ्या ग्...
Continue reading
बँकांना सलग पाच दिवस सुट्टी; सॅलरी कधी जमा होणार? केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Bank Holiday : सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस बँक कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावित तीन दिवसांच्या संपामुळे बँक...
Continue reading
Donald Trump : ट्रम्प यांची मोठी घोषणा; होर्मुजच्या सामुद्रधुनीला ‘ट्रम्प स्ट्रेट’ नाव देण्याची चर्चा, इराणच्या 7 दिवसांच्या प्रस्तावाने वाढली जगाची चिंता
अमेरिका-इराण संघर्षाच्या...
Continue reading
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; वाशिममध्ये नेमकं काय म्हणाले?
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणव...
Continue reading
ज्ञानेश कुमारांमुळेच शिंदे-अजितदादा निवडणूक जिंकले; संजय राऊतांचा गंभीर आरोप, महाराष्ट्रातील निवडणूक रद्द करण्याची मागणी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरून देश...
Continue reading
सणासुदीत खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता; केंद्र सरकारकडून आयात शुल्कात मोठी कपात
कच्च्या सोयाबीन आणि पामतेलावरील शुल्क १० टक्क्यांवरून ५ टक्के; कच्च्या सूर्यफूल तेलावरील आयात शुल...
Continue reading
Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किंमतीत किंचित घट; पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर
Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत बुधवारी झालेल्या...
Continue reading
ज्ञानेश कुमार यांचा ‘खापर पणजोबा’ कुठून आला? फॉर्म-६च्या वादावर संजय राऊत आक्रमक; महाभियोग आणण्याची घोषणा निवडणूक आयोगातील कथित अंतर्गत मतभेद आणि मतदार यादीच्या व...
Continue reading
Raj Thackeray निवडणूक आयोगावर आक्रमक; ‘१४ आक्षेपांनंतरही निर्णय झाले, मग कर्ताकरविता कोण?’
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभारावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray...
Continue reading
समितीच्या ठाम मागण्या
पळसखेड चक्का येथील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मंजूर मदत तातडीने वितरित करावी.
बुलढाणा जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किमान 50,000 रुपये मदत द्यावी.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दलाल व बँकांच्या जाळ्यात न अडकवता थेट खात्यावर मदत द्यावी.
जर शासन व प्रशासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर जलसमाधी आंदोलन अपरिहार्य ठरेल. अशा परिस्थितीत उद्भवणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.
read also : https://ajinkyabharat.com/chohotta-bazaar-society-shibir-shibir-and-mass-communication-program/