“आई घराबाहेर,सावत्र बापाचा ५ वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार”

सावत्र बापाचा ५ वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार

गरबा खेळायला गेलेल्या आईच्या अनुपस्थितीत सावत्र बापाकडून ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

अकोला – दि. २९ सप्टेंबर २०२५अकोला शहरात पुन्हा एकदा नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावत्र बापाने केवळ पाच वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने अकोला हादरला असून परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी पीडित मुलीची आई गरबा पाहण्यासाठी बाहेर गेली होती. घरातून जाण्यापूर्वी तिने मुलगा व मुलीला सावत्र वडिलांकडे राहण्यास सांगितले होते. मात्र, आरोपी शहाने (सावत्र वडील) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास पाच वर्षीय मुलीवर घृणास्पद कृत्य केले. या घटनेनंतर चिमुकलीला तीव्र वेदना होऊ लागल्या. आई घरी परत आल्यानंतर मुलीने तिला संपूर्ण प्रकार सांगितला.त्यानंतर घाबरलेल्या आईने तात्काळ मुलीला शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या पीडित बालिका अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत आहे.घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. आरोपीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे यांनी दिली.दरम्यान, परिसरात या घटनेबाबत तीव्र संतापाची लाट उसळली असून नागरिक व समाजसेवी संस्थांकडून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे. “बालकांवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे अशा नराधमांना कठोर शिक्षा करून समाजात कडक संदेश जावा,” अशी मागणी नागरिकांनी केली आहे.या घटनेमुळे अकोल्यातील नागरिक हादरले असून, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी समाजाच्या विविध स्तरांतून आवाज उठत आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

read also : https://ajinkyabharat.com/vaibhav-suryavanshi-ipl-madhe-vay-pahoon-saga-khaka/

Related News

Related News