योजनेचा लाभ ग्रामीण महिलांना मिळत नाही

लाडकी बहिणींच्या हातून योजना सुटली का?

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेली महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या ग्रामीण भागातील महिला लाभार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया बंधनकारक करण्यात आल्याने अनेक महिलांना तांत्रिक अडचणींमुळे योजना मिळवण्यात अडथळा येत आहे. ई-केवायसीसाठी आवश्यक वेबसाईट व्यवस्थित चालत नसल्याने ग्रामीण भागातील महिला सायबर कॅफेवर तासन्‌तास वाट पाहत आहेत. यामुळे त्यांचा वेळ, पैसा दोन्ही वाया जात असून, अनेक पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करत आहेत.

तांत्रिक बिघाड आणि गैरसोय: वेबसाईट हँग होणे, सर्वर डाऊन होणे अशा कारणांमुळे नोंदणी प्रक्रिया अडचणीत येत आहे. शासकीय केंद्रांवर रांगा लावूनही महिलांना लाभ मिळत नसल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ई-केवायसी बंधनकारक का? सरकारने बोगस लाभार्थ्यांचे अर्ज आढळून येण्यामुळे ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली होती. यामुळे फक्त खऱ्या पात्र महिलांनाच योजना मिळेल, अशी अपेक्षा आहे. परंतु, सध्याच्या तांत्रिक अडचणींमुळे पात्र महिलांची गैरसोय होत आहे.

स्थानिक प्रशासनाकडे मागणी: नंदुरबार जिल्ह्यातील महिलांनी त्वरित तांत्रिक सुधारणा करावी, ई-केवायसी वेबसाईट सुरळीत चालावी अशी मागणी केली आहे. यामुळे गरीब आणि गरजू महिलांना सरकारी योजनेचा लाभ विनाअडथळा मिळेल आणि होणारी पायपीट थांबेल.

read also:https://ajinkyabharat.com/solution-shibir-and-mass-communication/