सूर्यकुमार यादवने पाक पत्रकारांच्या जखमेवर चोळलं मीठ

प्रश्नांमध्ये भरलेला राग, पण उत्तरात झळकली परिपक्वता

आशिया कपमध्ये भारताचा विजयी झेंडा; पत्रकार परिषदेत पाकिस्तानी पत्रकाराला सूर्यकुमार यादवचं सडेतोड उत्तर चर्चेत, आशिया कप 2025 मध्ये भारताने विजयी मोहीम पूर्ण करत पाकिस्तानवर अंतिम सामन्यात मात केली आणि आशियाचा किताब पटकावला. या विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याला एका पाकिस्तानी पत्रकाराने भडक प्रश्न विचारत अस्वस्थ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यादवने शांततेने आणि हुशारीने दिलेलं उत्तर सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. फायनलमध्ये पाकिस्तानला 5 विकेट्सने पराभूत करून भारताने आशिया कपवर नाव कोरलं. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्लेअर ऑफ द टूर्नामेंट अभिषेक शर्मा यांनी पत्रकार परिषदेत भाग घेतला. या दरम्यान, एका पाकिस्तानी पत्रकाराने “क्रिकेटमध्ये राजकारण आणताय का?”, “पाक खेळाडूंशी हस्तांदोलन का नाही?”, अशा प्रश्नांची सरबत्ती केली. प्रश्न ऐकून सूर्यकुमार यादव क्षणभर हसला आणि म्हणाला.“तुम्ही तर चिडलात!” यानंतर तो म्हणाला, “तुम्ही एकाचवेळी इतक्या गोष्टी विचारल्या की मला प्रश्नच समजला नाही.” या उत्तराने पत्रकार परिषदेत हास्याचे वातावरण तयार झाले आणि सोशल मीडियावर सूर्यकुमार यादवच्या परिपक्वतेचं कौतुक होत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न हरता अपराजित मोहीम पूर्ण केली. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत 2025 चा टी20 आशिया कप जिंकला. जरी यादवची वैयक्तिक कामगिरी विशेष ठरली नाही, तरी नेतृत्वगुणांनी सर्वांचे लक्ष वेधले. सूर्यकुमार यादवच्या या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून, चाहत्यांकडून त्याच्या “कूल आणि स्मार्ट” प्रतिसादाचं कौतुक होत आहे. अनेकांनी लिहिलं आहे . “हेच म्हणतात सडेतोड पण सभ्य उत्तर!”

read also:https://ajinkyabharat.com/team-indianne-ashiya-cup-zinc/