६.३ दशलक्ष प्रवासी ‘डिजीयात्रा’तून लाभान्वित

मुंबई विमानतळावर डिजिटल क्रांती

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) प्रवाशांचा डिजिटल सेवांकडे कल झपाट्याने वाढताना दिसून येतो आहे. एप्रिल २०२४ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत ३.८६ दशलक्ष प्रवाशांनी सेल्फ-चेक-इन किओस्कद्वारे बोर्डिंग पास प्रिंट केले. त्याचबरोबर ३२ अत्याधुनिक सेल्फ-बॅगेज ड्रॉप युनिट्सच्या मदतीने तब्बल ७.१५ लाख बॅगा प्रक्रियेतून गेल्या.याच कालावधीत डिजीयात्रा या बायोमेट्रिक ई-गेट सेवेचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या तब्बल ६.३ दशलक्षांवर पोहोचली आहे. यामुळे मुंबई विमानतळावर प्रवासाचा अनुभव अधिक सुलभ, जलद व तंत्रज्ञानाधारित बनला आहे.भारतामधील दुसऱ्या क्रमांकाचे व्यस्त विमानतळ असलेल्या मुंबई विमानतळावर या वाढत्या डिजिटल स्वीकारामुळे प्रवाशांची सोय तर होतेच, शिवाय विमानतळाची कार्यक्षमताही मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसते आहे. मुंबईकरांसाठी आणि देशविदेशातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा अखंड आणि सहज प्रवासाची हमी देणारी ठरत आहे.

read also : https://ajinkyabharat.com/ind-vs-pak-final-taust-toss-zinc/